ETV Bharat / state

एनडीए, एनए अकादमीच्या परीक्षांसाठी रेल्वेच्या 23 विशेष गाड्या - एडीए, एनए परीक्षा

कोरोना पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेत पोहोचता येणेही कठीण होते. खासगी वाहनातून जायचे झाल्यास ई पास काढणे, तो वेळेत मिळणे न मिळणे अशा अनेक अडचणी होत्या. या पार्श्वभूमीवर अकादमीच्या परीक्षा विभागाने रेल्वे आणि एसटी महामंडळाला विशेष गाड्यांची विनंती केली होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

nda and na exams  special trains for nda and na exams  एडीए, एनए अकादमीच्या परीक्षांसाठी विशेष रेल्वे  एडीए, एनए परीक्षा
एनडीए, एनए अकादमीच्या परीक्षांसाठी रेल्वेच्या 23 विशेष गाड्या
author img

By

Published : Sep 5, 2020, 8:58 AM IST

मुंबई - राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) व नौदल अकादमी(एनए)च्या परीक्षा ५ व ६ सप्टेंबरला होणार आहेत. त्यासाठी परीक्षार्थींना त्यांच्या सेंटरपर्यंत वेळेत पोहोचता यावे म्हणून मध्य रेल्वेने दोन्ही दिवशी अप व डाऊन अशा २३ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गाड्यांमध्ये प्रवास करताना कोविड-19 साठी देण्यात आलेले सर्व नियम व अटींचे पालन करणे बंधककारक असेल. सर्व गाड्या पूर्णपणे आरक्षीत असणार आहेत. आरक्षित तिकीट काढूनच प्रवास करता येणार आहे. त्यासाठी आरक्षण खिडकी किंवा ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे. मेमू गाडी सोडून सर्व गाड्या आरक्षित राहतील. विशेष गाडीचे आरक्षण हे 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. मेमू गाडी ही अनारक्षित राहील. परीक्षार्थींना अनारक्षित तिकीट काढून प्रवास करावा लागेल. सोबत आपले हॉल तिकीट ठेवावे लागेल. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत जाणे व तेथून परत येण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते सावंतवाडी, मडगाव आणि कोल्हापूर ते सावंतवाडी, तर मध्य रेल्वेवर सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, भुसावळ, नागपूर ते मुंबई, पुणे-हैदराबाद, कोल्हापूर-नागपूर, पुणे-नागपूर, अमरावती-नागपूर, जळगाव-नागपूर, पनवेल-नागपूर, अहमदनगर-नागपूर, अकोला-नागपूर, मुंबई-हैदराबाद दरम्यान या स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. यासोबतच एसटी महामंडळाने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभाग नियंत्रकांना जिल्हावार बसेस सोडण्यास सांगितले आहे.

विशेष गाड्यांचे वेळापत्रक -

गाडी क्रमांक नावदिनांकवेळ
०११३५सीएसएमटी-सावंतवाडी ट्रेन ४, ६ सप्टेंबररात्री १० वा.
०११४७ सीएसएमटी-मडगाव ट्रेन ५ सप्टेंबरसकाळी ११.०५वा
०११४९कोल्हापुर- मडगाव ट्रेन ५ सप्टेंबरसंध्याकाळी ७.३० वा
०२१५४सोलापूर-सीएसएमटी ट्रेन५ सप्टेंबररात्री १०.४० वा
०११३० पुणे-सीएसएमटी ट्रेन५ सप्टेंबररात्री ११.५० वा
०११३२अहमदनगर-सीएसएमटी ट्रेन५ सप्टेंबररात्री ९.०० वा
०११३४नाशिक-सीएसएमटी ट्रेन ५ सप्टेंबर रात्री ११.४५वा
०२१७२ भुसावळ -सीएसएमटी ट्रेन५ सप्टेंबर रात्री ९.१५ वा
०११५५ पुणे-हैदराबाद ट्रेन५ सप्टेंबर दुपारी २.१५ वा
०११३७ कोल्हापूर-नागपूर ट्रेन५ सप्टेंबरसकाळी ८.०५ वा
०२१५९ पुणे-नागपूर ट्रेन ५ सप्टेंबरदुपारी ४.१५वा
०२१६१सीएसएमटी-नागपूर ट्रेन५ सप्टेंबरसंध्याकाळी ५.१५वा
०२१६३ नाशिक रोड-नागपूर ट्रेन५ सप्टेंबर दुपारी ४.१०वा
०२१६५ जळगाव-नागपूर ट्रेन५ सप्टेंबर रात्री ९.३०वा
०२१६७ अहमदनगर-नागपूर ट्रेन५ सप्टेंबर दुपारी ४.०० वा
०२१६९पनवेल-नागपूर ट्रेन५ सप्टेंबरदुपारी १.५० वा
०११४५पुणे-अहमदाबाद५ सप्टेंबरसंध्याकाळी ५.३०वा
०११५१कोल्हापूर-धारवाड ट्रेन५ सप्टेंबररात्री १० वा
०११५३ पुणे-धारवाड ट्रेन५ सप्टेंबरसंध्याकाळी ५.०५ वा
०११५७एलटीटी-हैदराबाद ट्रेन५ सप्टेंबरदुपारी २ वाजता

याशिवाय ०११३९ अमरावती-नागपूर मेमू ट्रेन रात्री १२.१० वा, ०११४१ अकोला-नागपूर मेमू ट्रेन रात्री १२.३० वा, ०११४३ बल्लारशहा-नागपूर मेमू ट्रेन रात्री १२.३० वाजता सोडण्यात येणार आहेत. या गाड्या ६ सप्टेंबर रोजी धावणार आहेत. विद्यार्थी या गाड्यांचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन करू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.