मुंबई : दिवाळीचा सण ( Diwali festival ) कोरोना महामारीच्या साथीनंतर दोन वर्षानी अत्यंत उत्साहाने देशभर साजरा होण्याची तयारी सुरू झालेली आहे. बाजारपेठ गजबजलेल्या दिसत आहेत. नातेवाईकांकडे जाण्यासाठी प्रवाशांनी आरक्षण या आधीच केलेले आहे. मात्र मेल एक्सप्रेस गाड्यांची संख्या पुरेशी नसल्यामुळे पश्चिम रेल्वेने बांद्रा ते भावनगर अतिरिक्त क्षणासाठी ट्रेन सोडण्याचा निर्णय ( Bandra to Bhavnagar additional trains for Diwali ) घेतला आहे.
प्रवाशांना खास सोय : शुक्रवार 21 ऑक्टोबर 2022 पासून ते 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत बांद्रा ते भावनगर एक्सप्रेस ट्रेन पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात येणार आहे. जेणेकरून दिवाळी निमित्ताने मुंबई ते भावनगर प्रवाशांना येण्यासाठी जाण्यासाठी खास सोय होणार ( extra trains from Western Railway for Diwali) आहे. तर भावनगर ते बांद्रा दिशेने येताना 20 ऑक्टोबरला सुरुवात होऊन 17 नोव्हेंबर पर्यंत ही ट्रेन धावणार आहे.अशी माहिती पश्चिम रेल्वे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ( Western Railway Public Relations Officer Sumit Thakur ) सांगितले.