ETV Bharat / state

सीएसएमटीवरून लखनऊला श्रमिक एक्सप्रेस रवाना

रेल्वे अधिकारी व सरकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर पाळत श्रमिक एक्सप्रेस रवाना करण्यात आली.

सीएसएमटीवरून लखनऊला श्रमिक एक्सप्रेस रवाना
सीएसएमटीवरून लखनऊला श्रमिक एक्सप्रेस रवाना
author img

By

Published : May 9, 2020, 4:44 PM IST

मुंबई - स्थलांतरित मजूर, कामगारांना घेऊन आज दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून लखनऊला श्रमिक एक्सप्रेस रवाना झाली. सुमारे 1130 स्थलांतरित मजूर या श्रमिक एक्सप्रेसमधून आपल्या मूळगावी जाण्यास निघाले. यावेळी रेल्वे अधिकारी व सरकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर पाळत श्रमिक एक्सप्रेस रवाना करण्यात आली.

लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. अनेक राज्यात परराज्यातील मजूर रोजगारासाठी आलेले असतात. लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकून पडले. त्यांना आपल्या मूळ गावी परत जाता येत नव्हते. मात्र, आता सरकारने अशा स्थलांतरित कामगारांसाठी श्रमिक ट्रेन या विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून स्थलांतरित कामगार आपल्या मूळ गावी पोहोचू शकत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.