ETV Bharat / state

Exclusive Interview Ujjwal Nikam : राजकारणात येणार पद्मश्री उज्ज्वल निकम?

हा प्रश्न जर-तरचा आहे. माणसाने कितीही विचार केला तरी त्याला 'नसीब से ज्यादा आणि समय से पहले कुछ नहीं मिलता' यामुळे आपल्या प्रारब्धात काय आहे हे आपल्याला माहित नसतं. परंतु ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे चिंतनाने काम केलं तर त्या कामात यशस्वी होऊ शकतो.

Special Public Procecutor Ujjwal Nikam Special Interview with ETV Bharat Part 2
पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्याशी ईटीव्ही भारतने साधलेला विशेष संवाद
author img

By

Published : Nov 27, 2021, 11:17 AM IST

Updated : Nov 27, 2021, 12:57 PM IST

हैदराबाद - विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्याशी ईटीव्ही भारतने विशेष संवाद साधला. यावेळी त्यांना उज्ज्वल निकम भविष्यात राजकारणात प्रवेश करणात का? याबाबत विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, भविष्यात जर कोणत्या पक्षाने संधी दिली तर त्याबाबत नक्कीच विचार करेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ( Ujjwal Nikam Special Interview with ETV Bharat )

पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्याशी ईटीव्ही भारतने साधलेला विशेष संवाद

प्रश्न - न्यायालयीन प्रकिया, वकिली क्षेत्रात तुम्ही इतक्या वर्षांपासून आहात. सामान्य माणूस जर न्यायालयीन प्रक्रियेत अडकला तर त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत अनेक वर्ष निघून जातात. या न्यायालयीन प्रक्रियेबद्दल तुमचं काय मत आहे?

उत्तर - आपली न्यायव्यवस्था ब्रिटीशांसारखी आहे. याला आम्ही साखळी न्यायव्यवस्था म्हणतो. कनिष्ठ न्यायालयाने निकाल दिल्यानतंर त्याच्याविरुद्ध अपील, याप्रकारे अपिलानंतर अपिल, या साखळी न्यायव्यस्थमध्ये काही वेळ लागतो हे खरं आहे. परंतु ज्या गुन्ह्यांचा सामाजिक परिणाम होत असतो, ज्या गुन्ह्यांमुळे समाजावर विपरीत परिणाम होतो, ज्या गुन्ह्याचे भीषण परिणाम म्हणून सामाजिक स्वास्थ्य बिघडते, अशा गुन्ह्यांची सुनावणी तातडीने घेतली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. त्यासाठी सरकारला काही पाऊले उचलावी लागतील. ही पाऊले उचलाना देखील न्याय घाईघाईत नाही तर न्याय दिल्यासारखं सामान्य माणसाला वाटलं पाहिजे. आमच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये संपूर्ण न्यायव्यवस्थेचं महत्त्व फार महत्त्वपूर्ण आहे. कुठेही जातीय दंगा झाला, धार्मिक दंगा झाला तर लोक मंत्र्यांची चौकशी मागत नाही, नेत्याची चौकशी मागत नाही तर न्यायालयीन चौकशी मागतात, हा सामान्य माणसाचा न्यायालयीन प्रक्रियेबद्दल असलेला आदर आहे. परंतु दुर्दैवाने हा आदरदेखील सध्या कमी होत चालला आहे. का होत चालला आहे, याचे विश्लेषण मी आता करणार नाही. मात्र, ही काळाची गरज आहे. न्यायव्यवस्थेतही बदल होणे गरजेचे आहे.

विशेषत: प्रसारमाध्यमांमध्ये एखादी गोष्ट किती चविष्टपणाने दोन-तीन आठवडे रंगविली जाते. एखादी फालतू गोष्ट सारखी-सारखी दाखविली जाते हे आपले अध:पतन नाही का? देशामध्ये अनेक गंभीर प्रश्न आहेत. चीन काय करते आहे, शेतकऱ्यांची प्रश्न आहेत, यासांरख्या अनेक सामाजिक प्रश्नांची उकल न करता फक्त कुणाकडे काहीतरी किरकोळ स्वरुपात सापडलं, ते सतत ब्रेकिंग न्यूजच्या स्वरुपात दाखवणं, त्यावर डिबेट, आरोप-प्रत्यारोप, अशा रितीच्या चर्चा बागळून लोकांची मने विटत जातात, हेदेखील प्रसारमाध्यमांनी लक्षात घेतले पाहिजे.

हेही वाचा - 26/11 Mumbai Attack : पाकिस्तानच्या दहशतवादाचा जगासमोर पर्दाफाश केला हेच 26/11चे यश - उज्ज्वल निकम

प्रश्न - राजकारणात येण्याबाबत काय म्हणाले उज्ज्वल निकम?

उत्तर - हा प्रश्न जर-तरचा आहे. माणसाने कितीही विचार केला तरी त्याला 'नसीब से ज्यादा आणि समय से पहले कुछ नहीं मिलता' यामुळे आपल्या प्रारब्धात काय आहे हे आपल्याला माहित नसतं. परंतु ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे चिंतनाने काम केलं तर त्या कामात यशस्वी होऊ शकतो. मी एवढंच म्हणेन की, भविष्यात काय होतं ते पाहूया. मी आपणहून कुठलेही प्रयत्न करणार नाही. परंतु कोणी संधी दिली, चांगल्या प्रकारची संधी असेल तर त्याचा विचार करेन. ( Ujjwal Nikam on Joining Politics )

मध्यंतरीच्या काळात मला राजकीय पक्षांकडून लोकसभेसाठी विचारणा झाली होती. परंतु मी त्यावेळी विचार केलेला नव्हता. मी त्यावेळी नकार दिला. त्याला कारणं अनेक आहेत. पण राजकारण हे वाईट नाही. राजकारणदेखील चांगलं आहे. यासोबत मतदारदेखील सुधारले गेले पाहिजे. आम्ही फक्त राजकारण्यांना दोष देतो मतदारांना नाही देत. मतदाराने जर चांगल्या लोकांना निवडून दिलं, कोणत्याही आमिषाला, प्रलोबधनाला बळी नाही पडलं तर राजकारण्यांना देखील तसं करण्याची गरज भासणार नाही. म्हणून एखादं क्षेत्र चांगलं आणि एखादं क्षेत्र वाईट, असं मानण्याचं कारण नाही. प्रत्येक क्षेत्र चांगलं असतं. मात्र, ते क्षेत्र गढूळ होतं की स्वच्छ होतं हे त्या क्षेत्रातील काम करणाऱ्यांवर अवलंबून असतं.

Last Updated : Nov 27, 2021, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.