मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीला एनडीपीएस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरू असताना हा तपास अंमली पदार्थांपर्यंत गेला. त्यानंतर सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांना नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अटक केली होती. रियाला काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला असला तरी शोविक तुरूंगातच होता. अशा परिस्थितीत शोविकने यापूर्वीही न्यायालयात नवीन जामीन याचिका दाखल केली होती. त्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.
शोविक चक्रवर्ती यांनी मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयात नवीन जामीन याचिका दाखल केली होती, ज्यात त्यांनी गेल्या महिन्यात सर्वेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेतला होता. न्यायालयाने यापूर्वी शोविकचा जामीन अर्ज अनेक वेळा फेटाळून लावला होता. पण, आता त्याचा जामीन अर्ज मान्य झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये आपल्या निर्णयामध्ये असे म्हटले होते की एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर केलेले विधान कबुलीजबाब मानले जाऊ शकत नाही. त्या आधारे कोणालाही तुरुंगात ठेवता येणार नाही.
यापूर्वी शोविकची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली होती. विशेष म्हणजे शोविक एनसीबीने रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांनाही अटक केली होती. मात्र, रिया, सॅम्युअल आणि दीपेश यांना यापूर्वी जामीन मंजूर झाला आहे.
हेही वाचा - संजय राऊत यांच्यावर उद्या होणार 'अँजिओप्लास्टी'
हेही वाचा - दुःखद : मुंबईत फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने लहानग्याचा मृत्यू