मुंबई : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी हमी भावापेक्षा कमी दर दिला जात ( Lower than guaranteed price to soybean farmers ) आहे. शेतकऱ्याला किमान नऊ हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा दर मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. मात्र शेतकऱ्यांना हमीभावा पेक्षा १०० ते ५०० रुपये अधिक दर राज्य सरकारकडून दिला जाईल अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली ( Agriculture Minister Abdul Sattar ) आहे. हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्यांवर शासन कारवाई करेल. तसेच राज्य सरकार सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यास तयार आहे त्यासाठी ही शेतकऱ्यांनी विचार करावा असेही अब्दुल सत्तार यांनी ( Abdul Sattar On Guaranteed Price Of Soybean ) सांगितले.
पावसाचा फटका बसलेल्या पिकांचे पंचनामे : परतीच्या पावसाने राज्यातील सोयाबीनसह अन्य पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अशा सर्व पिकांचे पंचनामे लवकरच केले जातील पंचनामे पूर्ण झाल्यानंतर खराब झालेल्या पिकांना शासकीय नियमानुसार मदत केली जाईल असेही सत्तार यांनी सांगितले.