ETV Bharat / state

मलबार हिलमध्ये वाढलेले मतदान काँग्रेसच्या पथ्यावर? वरळी आणि शिवडीत टक्का घसरला - malbar hil

उच्चभ्रू भागात मतदान कमी होत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत असते. मात्र, १७ व्या लोकसभेसाठी मलबार हिल भागात दक्षिण मुंबई मतदारसंघात सर्वाधिक ५६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हे वाढलेले मतदान हाय-फाय सोसायटीत वावरणारे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्या पथ्यावर पडणार की काय, अशी  स्थिती असल्याचे राजकीय  विश्लेषकांचे मत आहे.

मुंबई
author img

By

Published : May 1, 2019, 9:00 AM IST

मुंबई - उच्चभ्रू भागात मतदान कमी होत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत असते. मात्र, १७ व्या लोकसभेसाठी मलबार हिल भागात दक्षिण मुंबई मतदारसंघात सर्वाधिक ५६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हे वाढलेले मतदान हाय-फाय सोसायटीत वावरणारे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्या पथ्यावर पडणार की काय, अशी स्थिती असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघात मोदी लाटेत ५२.४९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१४ साली या लाटेत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा तब्बल १ लाख २७ हजार मतांनी पराभव केला होता. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या शिवडी आणि वरळी विधानसभा मतदारसंघात त्यावेळी सावंत यांना भरगोस मतदान झाले होते. मात्र, २०१९ च्या लढतीत या मतदारसंघात भायखळा आणि मलबार हिलच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. या भागात मराठी भाषिक मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. याउलट मुस्लीम बहुल असलेल्या भायखळा मतदार संघातही ५४ टक्के मतदान झाले आहे. तर उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या मलबार हिलमध्ये तब्बल ५६.०८ टक्के मतदान झाले आहे.

काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीरपणे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा पाठिंबा दर्शवणारा व्हिडिओही सोशल माध्यमांवर व्हायरल केला होता. त्याचा परिणाम मलबार हिलचे मतदान वाढण्यात झाल्याचे ही सांगण्यात येत आहे. मात्र, मंगलप्रभात लोढा हे मलबारहिल विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार असल्याने हे वाढलेले मतदान शिवसेनेच्या पथ्यावरही पडू शकेल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सव्वा चार लाख अल्पसंख्यांक मतदार आहेत. साडे तीन लाख मराठी भाषिक मतदार आहेत. दोन लाख उत्तर भारतीय तर निर्णायक ठरणारी गुजराती आणि मारवाडी मते सव्वा लाखांच्या आसपास आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेच्या प्रचारात भाजपवर सडकून टीका केली होती. भाजपच्या उमेदवारांना आणि त्यांना मदत करणाऱ्या शिवसेनेला मतदान करू नका, असे जाहीर आवाहन त्यांनी जनतेला केले होते. त्याचा येथील निवडणुकीत प्रभाव जाणवू शकतो. तसेच त्याचा लाखांच्या संख्येने असणाऱ्या मराठी मतदारांवरही प्रभाव पडू शकतो असेही विश्लेषकांचे मत आहे.

एकंदर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात गेल्या वर्षाच्या तुलनेत एक टक्का मतदान कमी झाले असले तरी अमराठी भाषिक भागात वाढलेला मतदानाचा टक्का काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दक्षिण मुंबई- विधानसभा निहाय मतदान

विधानसभा मतदान

वरळी 51.98

शिवडी 52.62

भायखळा 54.56

मलबार हिल 56. 08

मुंबादेवी 48.33

कुलाबा 45.16

एकूण- 51.45

Intro:मलबार हिल भागात वाढलेला मतदानाचा टक्का काँग्रेसच्या पथ्यावर ? वरळी आणि शिवडीच्या टक्का घसरला . 

मुंबई ३०

उच्चभ्रू भागात मतदाजन कमी होत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत असते ,मात्र १७ व्या लोकसभेसाठी मलबार हिल भागात दक्षिण मुंबई मतदार संघात सर्वाधिक ५६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे . हे वाढलेलं मतदान हाय सोसायटीत वावरणारे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्या पथ्यावर पडणार की काय अशी  स्तिथी असल्याचे राजकीय  विश्लेषकांचे मत आहे . 

गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदार संघात मोदी लाटेत ५२. ४९  टक्के मतदानाची नोंद झाली होती . २०१४ साली या लाटेत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा तब्बल  १लाख २७ हजार मतांनी पराभव केला होता . दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातल्या शिवडी आणि वरळी विधानसभेतल्या भागात त्यावेळी सावंत यांना भरगोस मतदान झाले होते . मात्र २०१९च्या लढतीत या मतदार संघात भायखळा आणि मलबार हिलच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे . या भागात मराठी भाषिक मतदारांची  संख्या  सर्वाधिक आहे . या उलट मुस्लिम बहुल असलेल्या भायखळा मतदार संघातही ५४. टाके मतदान झाले आहे .तर उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या मलबार हिल मध्ये तब्बल ५६. ८ टक्के मतदान झाले आहे . 

काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीरपणे  देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा पाठिंबा दर्शवणारा विडिओ ही सोशल माध्यमांवर वायरल केला होता .त्याचा परिणाम मलबार हिल चे मतदान वाढण्यात झाल्याचे ही सांगण्यात येतं आहे . मात्र मंगलप्रभात लोढा हे  मलबारहिल विधानसभेचे  भाजपचे आमदार  असल्याने हे वाढलेले मतदान शिवसेनेच्या पथ्यावरही पडू शकेल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे . 

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात सव्वा चार लाख अल्पसंख्यांक मतदार आहेत . साढे तीन लाख मराठी भाषिक मतदार आहेत . दोन लाख उत्तर भारतीय तर निर्णायक ठरणारी गुजराती आणि मारवाडी मते सव्वा लाखांच्या आसपास आहेत . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेच्या प्रचारात भाजपवर सडकून टीका केली होती . भाजपच्या उमेदवारांना आणि त्यांना मदत करणाऱ्या शिवसेनेला मतदान करू नका असे जाहीर आवाहन त्यांनी जनतेला केले होते . त्याचा हि या निवडणुकीत प्रभाव जाणवू शकतो तसेच त्याचा लाखांच्या संख्येने असणाऱ्या मराठी मतदारांवरही प्रभाव पडू शकतो असेही विश्लेषकांचे मत आहे . 

एकंदर दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात गेल्या वर्षाच्या तुलनेत एक टक्का मतदान कमी झाले असले तरी अमराठी भाषिक भागात वाढलेला मतदानाचा टक्का काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दक्षिण मुंबई- विधानसभा निहाय मतदान

विधानसभा मतदान

वरळी 51.98

शिवडी 52.62

भायखळा 54.56

मलबार हिल 56. 08

मुंबादेवी 48.33

कुलाबा 45.16

एकूण- 51.45 Body:.......Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.