ETV Bharat / state

Son Killed Mother : बेरोजगार मुलानं केला आईचा खून; 'हे' आहे धक्कादायक कारण - मुलाने केली आईची हत्या

Son Killed Mother : पोटच्या मुलाने आईची गळा दाबून हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील कोपरी परिसरात घडली आहे. (Woman Murder case Mumbai) मुलगा कामावर जात नसल्याने आई-मुलाच्या झालेल्या भांडणातून मुलाने चक्क आईचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी मुलाला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.

Son Killed Mother
आईचा गळा दाबून खून
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 9:59 PM IST

नवी मुंबई Son Killed Mother : नवी मुंबईतील वाशी परिसरातील कोपरी गावातील सागर भोईर इमारतीत रुपंचांद शेख (21) व त्याची आई सलमा उर्फ जहनारा खातून शेख हे दोन मायलेक राहत होते. मात्र, रूपंचांद शेख हा काहीच कमधंदा करीत नव्हता. तो सतत त्याच्या मित्रांसोबत उनाडक्या करीत होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी ही रूपंचांदची आई सलमा यांच्यावर येत होती. (Accused Son Arrested) त्यामुळे रूपंचांदने काहीतरी कमवून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा अशी सलमा यांची इच्छा होती. त्या सतत आपल्या मुलाला कामावर जाण्यासंबंधी सांगत असत. मात्र, आईने कितीही वेळा सांगितलं तरी रूपंचांद आईचं ऐकत नसायचा. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत होती. (Mumbai Crime)

आईचा केला गळा दाबून खून: कामधंदा न करता रुपंचांद हा आयते तुकडे तोडत असल्याने, आई-मुलात रविवारी मध्यरात्री सव्वा एक-दीडच्या सुमारास पुन्हा कामावर जाण्यावरून जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात रूपंचांदने घरातील पटक्याने गळा आवळून सलमा यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच जवळच राहणारी रूपंचांदची बहीण जासमीन रामभरोस ताती (23) घरी आली व तिने सलमाच्या खून प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व रूपंचांदच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला. आरोपी रूपंचांद शेख याला अटक केली असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांनी दिली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डमाळे अधिक तपास करीत आहेत.

पबजी गेम खेळण्यास मनाई केल्याने आईची हत्या: देशात याआधीही मुलाने रागाच्या भरात आईची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 8 जून, 2022 रोजी घडली होती. यामध्ये एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केली होती. पबजी गेम खेळण्यास मनाई केल्यामुळेच त्याने ही हत्या केली. ही घटना पीजीआय परिसरातील आहे. इयत्ता 10वीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केली. एवढेच नाही तर तो त्याच्या 10 वर्षांच्या लहान बहिणीसह 2 दिवस आईच्या मृतदेहाजवळ घरीच राहिला. मंगळवारी सायंकाळी मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने मुलाने हत्येची खोटी कहाणी रचून लष्करी अधिकारी असलेल्या वडिलांना माहिती दिली. पबजी गेम खेळण्यास मनाई केल्यामुळेच अल्पवयीन मुलाने आईची हत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

हेही वाचा:

  1. Gujarat Mass Suicide : धक्कादायक! एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण
  2. Death Threat to Mukesh Ambani : 20 कोटी द्या नाहीतर...; उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल
  3. Daughter in law molestation Case: सुनेशी लगट करत सासरा करायचा विनयभंग, तर पतीचेही परस्त्रीशी संबध, पीडितेची पोलिसात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.