मुंबई - वेबसाइटवर अर्ज भरा आणि कोरोनायोद्धा बनल्याचे प्रमाणपत्र घ्या, असे प्रकार सध्या सुरू झाले आहेत. अनेकजण अशा प्रकारे प्रमाणपत्र मिळवून फेसबुक, व्हॉट्सअॅपवर टाकून स्वस्तुती करून घेताना दिसत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमध्ये गरजू लोकांना मदत करणाऱ्या व्यक्तींना विविध संघटनांकडून कोरोनायोद्धा प्रमाणपत्र देण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच ऑनलाइन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी देखील सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला आहे.
अनेक वेबसाइटवर कोणत्याही प्रकारची माहिती न घेता आणि कामाचा आढावा न घेता हे प्रमाणपत्र देत आहेत. सोशल मीडियावर अशा कोरोनायोद्धाचे प्रमाणपत्रही फेसबुक व व्हॉट्सअॅपवर शेअर केले जात आहेत. टाळेबंदी दरम्यान सार्वजनिक सेवेत असल्याचे अशा प्रकारे तपासणी न करता इतर व विविध संस्थांकडून प्रमाणपत्र दिल्याबद्दल अनेकजण आक्षेप नोंदवित आहेत.
हेही वाचा - कोरोनाच्या संकटात आता 'निसर्ग'चे महासंकट; आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज