ETV Bharat / state

कोरोनाकाळातही शिक्षकांना शाळेत बोलावणाऱ्या संस्थाचालकांवर होणार कारवाई

मुंबई आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरातील शाळांमध्ये बोलावले जात असल्यावरून शाळांना ताकीद देण्याचे आदेश मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल नुकतीच आयुक्त कार्यालयानेही घेतली आहे.

author img

By

Published : Sep 22, 2020, 8:06 PM IST

शिक्षण विभाग
शिक्षण विभाग

मुंबई - राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये कोरोनाचा कहर सुरू असतानाच अनेक खासगी शाळांच्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांकडून शिक्षकांना शाळांमध्ये रोज हजेरी लावण्याचे आदेश दिले जात आहेत. इतकेच नाही तर शाळांमध्ये शिकवण्याचे काम नसतानाही त्यांना बसवून ठेवले जात असून याची गंभीर दखल शालेय शिक्षण विभागाने घेतली आहे.

मुंबई आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरातील शाळांमध्ये बोलावले जात असल्यावरून शाळांना ताकीद देण्याचे आदेश मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल नुकतीच शिक्षण आयुक्त कार्यालयानेही घेतली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना आणि शिक्षक परिषदेने केलेल्या तक्रारीची नोंद घेण्यात आली असल्याची माहिती या संघटनांच्या प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.

राज्यात 15 जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या आदेशामुळे सर्व शाळांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. तर शिक्षकांना शाळेत येण्याऐवजी वर्क फ्रॉर्म होम करण्याची मुभासुद्धा देण्यात आली आहे, असे असताना शिक्षकांना शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात बोलून त्यांना बसून ठेवण्याचे प्रकार मुंबईतील अनेक शाळांमध्ये करण्यात येत असल्याचे समोर आले होते.

शिक्षक परिषदेकडून शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्याकडे तक्रार नोंदविली होती. त्या पार्श्वभूमीवर विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने शिक्षकांना यापुढे कामाशिवाय शाळांमध्ये बोलवण्यात येऊ नये, असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत, अशी माहिती शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.