सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी ( दि. 20 जानेवारी) एकाच दिवसात शहर आणि जिल्ह्यात 784 रुग्णांची वाढ झाली ( Solapur Corona Update ) आहे. तर ग्रामीण भागात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोलापुरातील ग्रामीण भाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट केंद्र ठरत आहे.
सोलापूर शहर अहवाल - सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने शहरात 987 जणांची तपासणी केली. त्यापैकी 218 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सोलापुरातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या फक्त 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरातील सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढत चालला आहे. आजमितीस शहरातील विविध रुग्णालयात 1 हजार 878 सक्रिय रुग्ण ( Active Cases in Solapur City ) असून रुग्ण उपचार घेत आहेत.
सोलापूर ग्रामीण अहवाल - जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात 2 हजार 84 जणांची तपासणी केली आहे. या तपासणीमधून 566 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून एकाचा मृत्यू झाला आहे. 232 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ग्रामीण भागातील सक्रिय रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत सोलापुरातील ग्रामीण भागात 2 हजार 101 सक्रिय रुग्ण ( Active Cases in Solapur Rural ) असून ते कोरोना आजाराशी झुंज देत आहेत.