ETV Bharat / state

लोकशाही धोक्यात, मोदींनी जनतेची फसवणूक केलीय - मेधा पाटकर

मोदींनी सर्वांना १५ लाख देण्याचे आश्वासन दिले. पण, ते पूर्ण केले नाही. त्यामुळे लोक त्यांना फेकू म्हणू लागले आहेत. राहुल गांधींच्या किमान वेतन योजनेचे त्यांनी स्वागत केले. पण, त्या म्हणाल्या की ही रक्कम अपुरी आहे. सरकारने किमान वेतनाची मर्यादा १८ हजार करायला हवी.

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर
author img

By

Published : Mar 31, 2019, 3:22 PM IST

मुंबई - नर्मदा बचाव आंदोलनात आपली हयात घालणाऱया मेधा पाटकर यांचे नाव सर्वांन परिचीत आहे. गेली अनेक वर्षे त्या विविध क्षेत्रातील श्रमिकांसाठी आंदोलने, मोर्चे करत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाकडून सहभाग घेतला होता. यावेळची निवडणूक अनेक अंगांनी महत्वाची आहे. ईटीव्ही भारतने मेधा पाटकरांशी विविद मुद्यांवर बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही त्यांची मते ईटीव्ही समोर मांडली. त्यांच्या मुलाखतीतले हे महत्वाचे मुद्दे....

मोदींनी जनतेची फसवणूक केली

सुरुवातीलाच मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, की मोदींनी सर्वांना १५ लाख देण्याचे आश्वासन दिले. पण, ते पूर्ण केले नाही. त्यामुळे लोक त्यांना फेकू म्हणू लागले आहेत. राहुल गांधींच्या किमान वेतन योजनेचे त्यांनी स्वागत केले. पण, त्या म्हणाल्या की ही रक्कम अपुरी आहे. सरकारने किमान वेतनाची मर्यादा १८ हजार करायला हवी.

कंपन्यांसाठी घोषणांची अचूक अंमलबजावणी, पण गरिबांसाठी नाही

पाटकर म्हणाल्या, की गरिबांसाठी अनेक कायदे आहेत. युपीएच्या काळातही पेसा, वनाधिकार कायदा असे कायदे झाले. पण, त्यांची अंमलबजावणी झाली नाही. कंपन्यासाठीच्या घोषणा आणि पॅकेजची मात्र अचूक अंमलबजावणी होते. प्रत्येक राजकीय पक्षाने श्रमिकांच्या उत्पन्नवाढीची हमी आपल्या निवडणूक जाहिरनाम्यातच दिली पाहिजे.

शासकीय नोकरांच्या समकक्ष उत्पन्न पाहिजे

२००८ च्या असंघटीत कामगार कायद्याची अंमलबजावणी व्हायला हवी. किमान वेतन देताना त्यांचे उत्पन्न वाढेल हे पाहिले पाहिजे. टेलर, कुंभार, मोलकरीण सर्व घटकांचे उत्पन्न वाढवून शासकीय नोकरांच्या समकक्ष उत्पन्नाची हमी दिली पाहिजे.

रोजगार हमी योजना गरीबांना आळशी करते का? प्रश्नांवर त्या म्हणाल्या

धनिकांनी शोषण करुन धन मिळवले आहे. त्यांना गरिबांवर टीका करण्याचा अधिकार नाही. आज शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न नाही. त्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. आज स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. तसेच, रोजगार हमीची योजना सक्षमपणे राबवून शेतीचा रोहयोत समावेश करुन शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे. शेतमजुरांना किमान वेतन मिळण्यासाठी शेतकरी सक्षम केला पाहिजे, असे पाटकर म्हणाल्या.

सरकारने गरिबा गरिबात भिंती उभारण्याचे काम करता कामा नये. देशातील संपत्ती कर मुळातच कमी आहे. मुठभर धनिक राजकीय पक्षांच्या सामिल आहेत. त्यामुळे गरिबांना सरकारी मदत होताना धनिकांनाही विरोध करता कामा नये. विद्यमान सरकार अदानी आणि अंबानीच्या दावणीला बांधले आहे, अशी टीका त्यांनी केली.

हर हाथ को काम दो...काम का दाम दो....

उद्योग धार्जिण्या धोरणामुळे कष्टकरी संपवला जात आहे, असे पाटकर म्हणाल्या. केंद्राचे धोरण आणि देशाचा अर्थसंकल्प भांडवलदारांना पुरक ठरतो आहे. मध्यप्रदेशात बिर्लांनी स्वतःच्या फायद्यासाठी कारखाने बंद करुन कामगार रस्त्यावर आणलाय. आर्थिक फायद्यासाठी कामगारांना पिळण्याचे काम सुरू असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

शेतकरी आणि महिलांवर सभागृहात गंभीर चर्चा होत नाही

संसदेतल्या कामकजाबद्दल पाटकर म्हणाल्या, की मी २०१४ मध्ये एकदा निवडणूक लढवून पाहिली. अनेकदा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना देखील लोकांचे प्रश्न मांडता येत नाहीत. शेतकरी आत्महत्या आणि महिला प्रश्नांवर सभागृहात गंभीर चर्चा होत नाही. लोकप्रतिनिधींनी आंदोलन करुन अपेक्षित ध्येय गाठावे. आजही आम्ही लोकमंचच्या उभारणीतून लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवला आहे, असे पाटकर म्हणाल्या.

लोकशाही वाचायला पाहिजे, अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हायला हवे

मेधा पाटकर म्हणाल्या, की मी गेल्यावेळी निवडणूक लढले. पण, त्यावेळी परप्रांतिय आणि अल्पसंख्यकांची मते विभागली गेली. मला मध्यमवर्गियांनी मते दिली. पण गरीब विभागले गेले. आता तर लॅपटॉप आणि मंगळसुत्रावर निवडणूक होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पाटकर म्हणाल्या, की लोकशाही वाचली पाहिजे. अधिकारांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. त्यासाठी न्याय आणि समतेची मांडणी करत जन आंदोलन करावे लागत आहे. ते आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार असा विश्वास मेधा पाटकरांनी व्यक्त केला.

Intro:MH_Medha_PatkarRevised_31.3.19

Vdo slugs from mojo
( Marathi)
MH_MedhaPatkar,NyasInterviewMarathi27.3.19
( Hindi)
MH_MedhaPatkar,NyasInterviewHindi27.3.19

लोकशाहीचा बट्ट्याबोळ रोखण्यासाठी जनआंदोलनाची ताकद हवी: मेधा पाटकर

गरिबांना किमान उत्पन्नाच्या वाढ करुन
श्रमिकांचे हक्क द्या

मेधा पाटकर विलक्षण क्षमतेच्या समाजसेविका. ज्यांनी आपलं सुखासीन जगणं सोडून काटय़ाकुटय़ांचं आदिवासी जगणं स्वीकारलं. आदिवासी बांधवांना जगण्याचा हक्क व आनंद देण्यासाठी मोर्चे, संघर्षयात्रा, उपोषणे, आंदोलने आणि जलसमर्पण या मार्गाचा अवलंब करताना ज्यांना अटक, मारहाण, बदनामीला तोंड द्यावं लागलं, ‘नर्मदा बचाव’ चळवळीत ज्यांनी सरकार विरोधात गेली २५ वर्षे प्रदीर्घ लढा दिला, तसेच सरकारला भ्रष्टाचार, घोटाळे, अकार्यक्षमतेविषयी बेधडक जाब विचारला. त्याग मेधा पाटकरांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील गरिबांना किमान उत्पन्नाच्या हमीचे स्वागत करुन असंघटीत श्रमिकांना किमान अठरा हजार रुपये महीना मिळालाच पाहीजे अशी भुमिका 'ई- टिव्ही भारतचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत मांडली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील गरिबांना किमान उत्पन्नाची हमी दिली आहे. देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. ज्यांचं मासिक उत्पन्न १२ हजारापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. वर्षाला ७२ हजार रुपये गरीब कुटुंबाच्या खात्यात जमा केले जातील असे गांधींनी जाहीर केले आहे.

या योजनेचे स्वागत करत मेधा पाटकर म्हणाल्या,"असंघटीत कामगार हे 'असंघटीत' नव्हे तर कामगार असुरक्षित आहे. कामगारांसाठी कायदे आहेत. परंतु अंमलबजाणीची हमी नाही. पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाखाचे आश्वासन देऊन जनतेची प्रत्यक्षात फसवणुक केली, त्यामुळं त्यांना आता फेकू असं नाव पडलं आहे.

राहुल गांधींनी जाहीर केलेल्या किमान उत्पन्नात गरीबांना वर्षाला ७२ हजार आणि ६ हजार रुपये अपुरी आहे. अर्थात तिजोरीचा अंदाज घेऊनच योजना राबवली जाईल.
युपीएच्या काळात पेसा, वनाधिकार असे अनेक कायदे झाले, मात्र कामगारहिताच्या योजनांची मात्र अंमलबजावणी झाली नाही.श्रमिकांचे उत्पन्नवाढीच हमी प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणुक जाहीरनाम्यात दिली पाहीजे, असे त्या म्हणाल्या.
कंपन्यासाठीच्या पैकेज आणि घोषणांची अचूक अंमलबजावणी होती.
२००८ चा असंघटीत कामगारांचा कायदा
आणि सातव्या वेतन आयोग समकक्ष वेतन निश्चिती केली पाहीजे.

मोदींनी १५ लाख खात्यात देण्याची घोषणा करुन प्रत्यक्षात मात्र फसवणुकच केली.तशी कॉंग्रेसकडून अपेक्षा नाही. आता किमान वेतन देताना त्यांचे उत्पन्न वाढेल हे पाहीले हे पाहीजे. टेलर, कुंभार, मोलकरीण सर्व घटकांचे उत्पन्न वाढवून शासकीय नोकरांच्या समकक्ष उत्पन्नाची हमी दिली पाहीजे.

रोजगार हमी योजना गरीबांना आळशी करणारी योजना आहे का? या प्रश्नावर बोलताना पाटकर म्हणाल्या,

धनिकांनी शोषण करुन धन मिळवलेय. त्यांना गरीबांवर टिकेचा अधीकार नाही.
आज शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न नाही. त्यामुळं आत्महत्या वाढल्या. आजच्या घडीला स्वामिनाथन समितीची अंमलबजावणी करुन त्यांना सुरक्षित करणे गरजेचे आहे. रोजगार हमीची योजना सक्षमपणे राबवण्यासाठी शेतीचा रोहयोत समावेश करुन शेतमालाला योग्य भाव दिला पाहीजे. शेतमजूरांसाठी किमान वेतनासाठी शेतकरी सक्षम केला गेला पाहीजे.

सरकारनेच गरीबा- गरीबात भिंती उभारण्याचे काम करता कामा नये. देशातील संपत्ती कर मुळातच कमी आहे. मुठभर धनिक राजकीय पक्षांच्या सामिल आहेत. त्यामुळे गरीबांना सरकारी मदत होताना धनिकांनीही विरोध करता कामा नये. विद्यमान सरकार अदानी- अंबानीच्या दावणीला बांधले आहे. बँक खात्यात किमान शिल्लक नसेल तर बँक दंड लावते, परंतु उद्योगांना मात्र कर्जमाफी देऊन बँका बुडीत काढल्या जात आहेत.
विषमतारहीत समाज निर्मितीसाठी
हर हाथ को काम दो.. काम का दाम दो..रोजगार आमचा निर्धार आहे, असे मेधा पाटकर यांनी स्पष्ट केलं.

उद्योगधर्जिन्या धोरणामुळे कष्टकरी संपवला जात आहे. केंद्राचे धोरण आणि देशाचा अर्थसंकल्प भांडवलदारांना पुरक ठरतो, मग गरीबांना न्याय कसा मिळणार ? मध्यप्रदेशात बिर्लांनी स्वत:च्या फायद्यासाठी कारखाने बंद करुन कामगार रस्त्यावर आणलाय. भांडवलदारांना विरोध करता कामगार पर्याय देत असताना आर्थिक फायद्यासाठी भांडवलदार कामगारांना पिळण्याचे काम सुरु असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

आगामी लोकसभा निवडणुकांवर बोलताना मेधा पाटकर म्हणाल्या,निवडणुकीत उभं राहून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा २०१४ मधे एक प्रयत्न करुन पाहीला. अनेकदा निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधींना देखील लोकांचे प्रश्न मांडता येत नाही.शेतकरी आत्महत्या आणि महिला प्रश्नांवर सभागृहात अलिकडे गंभीर चर्चा होताना दिसत नाही.
लोकप्रतिनिधींनाही जनआंदोलन करुन अपेक्षित ध्येय गाठावे लागते. अनेकांनी ते केलेय.आजही लोकमंचाच्या उभारणीतून आम्ही लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवला आहे.
२०१४ ची निवडणुक मोदींचा हवेचा होता.मी स्वत: आम आदमी पक्षाकडून उभी राहीली. त्यावेळी परप्रांतिय, अल्पसंख्याकांची विभागली गेली. त्यामुळं हवाहवाई लढाईत आता सहभागी व्हावे वाटत नाही. मला मध्यमवर्गीयांना मतं दिली. परंतु गरीब विभागले गेले. पैसे आणि दारु वाटून जाती- जातीत विभाजन करुन त्यावेळी मतं फिरवण्यात आली. आता लँपटॉप आणि मंगळसुत्रावर निवडणुक होतात. लोकप्रतिनिधी कायदा अपुरा पडू लागलाय. लोकशाही वाचली पाहीले , अधिकारांचे विकेंद्रीकरण झाले पाहीजे.त्यासाठी न्याय आणि समतेची मांडणी करत जनआंदोलन करावे लागत आहे, ते आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार, असे मेधा पाटकर शेवटी म्हणाल्या.Body:Medha patkar121Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.