मुंबई - आपल्याला जे इतरांना सांगायचे असते ते चित्राच्या माध्यमातून देखील दाखवता येऊ शकते, असाच काहीसा प्रयत्न दादर येथे रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केला आहे. 5 वर्षांपासून ते वयोवृद्ध या सर्व गटातील 2600 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला.
हेही वाचा - CAA, NRC विरोधात असहकार करणार - कॉ. सीताराम येचुरी
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणारी चित्रकला स्पर्धा प्रसिद्ध आहे. यंदाची स्पर्धा दिवंगत व्यंगचित्रकार विकास सबनीस यांना समर्पित करण्यात आली. या स्पर्धेसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, बदलापूर, अंबरनाथ, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर या भागातून स्पर्धक आले होते. या स्पर्धेत स्पर्धकांनी वि. दा. सावरकर यांच्यावरील काही प्रसंग देखील रेखाटले. भारतीय सैनिकांचे शौर्य, अवयव दान, डिजिटल भारत, वाहतूक नियम, पूरग्रस्तांना मदत, प्लास्टिकचा पुनर्वापर, भजनातून हरवलेली पाखरे, याविषयावर देखील स्पर्धकांनी चित्र काढले होते.
हेही वाचा - बबनराव लोणीकरांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, काँग्रेसची मागणी
अनेक वर्षांपासून होत असलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद वाढत आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची चित्रे सामाजिक संदेश देणारे असतात. यावर्षी व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन झाले याची खंत आम्हाला जाणवत आहे, असेही विज्ञानेश मासावकर यांनी सांगितले.