मुंबई - ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2019’च्या अंतिम स्पर्धा फेरी व हार्डवेअर एडिशनचे आयआयटी मुंबईत 8 ते 12 जुलैपर्यंत दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील विद्यार्थी नवकल्पना मांडणार आहेत.
'स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2019'मध्ये विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही समस्या सोडवण्यासाठी एक मंच तयार केला जातो. उत्पादनातील नवकल्पना, समस्या सोडविण्याच्या मानसिकतेची कल्पना केली जाते.
‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2019 ‘हार्डवेअर एडिशन’ चे आयोजन ‘मानव संसाधन मंत्रालय (एमएचआरडी), भारत सरकार आणि इनोव्हेशन सेल’ने (एमआयसी) केले असून ह्या स्पर्धा 5 दिवस आहेत. वेगवेगळ्या कंपन्या आणि मंत्रालयांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या विविध समस्यांबद्दल निराकरण करण्यासाठी संपूर्ण भारतातील सहभागी संघ आपला मूळ उद्देश तयार करणार आहेत. ‘एसआयएच 2019’ मध्ये सहभागी झालेले संघ या विषयावर स्पर्धेत भाग घेणार आहेत.
1 )कृषी आणि ग्रामीण विकास : भारतातील प्राथमिक क्षेत्र-कृषी आणि आपल्या ग्रामीण जनतेच्या जीवनातील वाढीची गरज लक्षात घेऊन उपकरणांचा आराखडा तयार करणे.
2) आरोग्यसेवा आणि जैववैद्यकीय साधने : आरोग्य सेवेचे व्यवस्थापन करण्यास मदत करेल अशा उपकरणाचे आरेखन करणे
3) स्वच्छ पाणी : पाणी वितरण, व्यवस्थापन आणि शुध्दीकरण सुधारण्यासाठी अत्याधुनिक डिव्हाइसेस तयार करणे’
ही स्पर्धा संपूर्ण भारतातील संस्थांमधील पदवी विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांची निवड ‘एमएचआरडी’च्या ‘इनोव्हेशन सेल’ द्वारे होणार आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी, याचे ज्ञान स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-2019 मुळे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जागतिक स्तरावरील खासगी क्षेत्रातील नामवंत संस्थांनाही भेडसावणाऱ्या विविध आव्हानांवर तोडगा, उपाय कसे शोधावेत, त्यासाठी काय करावे लागेल याची संधी विद्यार्थ्यांना ‘एसआयएच-2019’ च्या आयोजनामुळे मिळणार आहे. देशातील हुशार विद्यार्थ्यांनाही खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे दरवाजे यामुळे उघडणार आहेत.