ETV Bharat / state

Sonu Nigam News : गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरात 72 लाखांची चोरी, कामावरून काढलेल्या ड्रायव्हरला संशयावरून अटक

प्रसिद्ध गायक सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरात ७२ लाखांची चोरी झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणात पूर्वीच्या वाहन चालकाला अटक केली आहे.

Sonu Nigam News
सोनू निगम न्यूज
author img

By

Published : Mar 23, 2023, 8:05 AM IST

मुंबई : गायक सोनू निगम पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. यापूर्वी एका कार्यक्रमात त्याला धक्काबुक्की झाल्याने तो जखमी झाला होता. आता, सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरात ७२ लाखांची चोरी झाली आहे. सोनू निगमचे वडील आगमकुमार निगम यांनी मुंबई पश्चिम उपनगरातील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आगम कुमार निगम यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी रेहानविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ३८०, ४५४ आणि ४५७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ओशिवारा पोलिसांनी रेहानचा शोध सुरू करत त्याला अटक केली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आगमकुमार आणि निकिता यांनी त्यांच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांचा वाहन चालक रेहान बॅग घेऊन त्याच्या फ्लॅटकडे जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले आहे.

सोनू निगमच्या कुटुंबाची चिंता वाढली रेहान वाहन चालक म्हणून आगम कुमार निगम यांच्याकडे काम करत होता. त्याच्याकडे फ्लॅटची डुप्लिकेट चावी होती, असा संशय आगम कुमार यांनी व्यक्त केला आहे. रेहानने डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील डिजिटल लॉकरमधून ७२ लाख रुपये चोरल्याचा आगमकुमार यांना संशय आहे. चोरीच्या या प्रकरणाने सोनू निगमच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे.

चोरीची घटना १९ मार्च ते २० मार्च दरम्यान घडल्याचा अंदाज - आगमकुमार निगम हे अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा येथील विंडसर ग्रँड बिल्डिंगमध्ये राहतात. चोरीची घटना १९ मार्च ते २० मार्च दरम्यान घडली होती, असा त्यांचा अंदाज आहे. रेहान याने निगम कुटुंबाकडे ८ महिने वाहन चालक म्हणून काम केले. मात्र, त्याचे काम समाधानकारक नसल्याने त्याला काढून टाकण्यात आले होते. आगमकुमार निगम यांनी बेडरूममध्ये डिजिटल लॉकरमध्ये पैशांची बॅग ठेवली होती. मात्र, पाहणी केली असताना डिजिटल लॉकरमधून 72 लाख गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर अगम कुमार यांनी फ्लॅट बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमधून रेहान हा दिसून आला. आगमकुमार यांनी उशिरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.