मुंबई - विक्रोळीच्या कैलास बिझनेस पार्कमध्ये हायरिक्स या नावाची ३५ मजली इमारत आहे. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलकाला आग लागली. ही माहिती अग्निशमन दलाला मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. ही घटना आज (शनिवार) रात्री घडली.
तेव्हा अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या आधिकाऱ्यांनी सांगितले. या बिझनेस पार्कमधील कार्यालये लॉकडाऊनमुळे बंद आहेत. यामुळे जीवीतहानी टळली.
हेही वाचा - मुंबईत मुसळधार; दादर, परळ अन् हिंदमाता परिसरात साचले पाणी
हेही वाचा - नायर रुग्णालयात 408 कोरोनाग्रस्त मातांनी दिला 412 कोरोना निगेटिव्ह बाळांना जन्म