ETV Bharat / state

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मुंबईत रुग्णांचे मृत्यू

author img

By

Published : Apr 14, 2021, 3:02 PM IST

मुंबईपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसई या शहरात मेडिकल ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे दहा कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची म्हणजेच प्राणवायूची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे.

ऑक्सिजन तुटवडा
ऑक्सिजन तुटवडा

मुंबई - मुंबईपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसई या शहरात मेडिकल ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे दहा कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची म्हणजेच प्राणवायूची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे.

भारतातील ऑक्सिजनचा वापर ...

सप्टेंबर २०२० महिन्यात देशात २,६७५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासली होती. यंदाच्या मार्च महिन्यात १,४५९ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासली.

मुंबईतील ऑक्सिजनचा मागणी आणि पुरवठा...

फेब्रुवारी महिन्यात हॉस्पिटलला दररोज १५० ते २०० मेट्रिक टनची आवश्यकता होती. मार्चपर्यंत ६५० ते ७५० मे टन तर ६ एप्रिलपर्यंत हीच मागणी ७७७ मे टनवर जाऊन पोहोचली. राज्याची ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता १,२५० मेट्रिक टन एवढी आहे. याशिवाय गुजरातकडून दररोज ३० ते ३५ मेट्रिक टन तसेच छत्तीसगडकडून ५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. राज्यात ३१ ऑक्सिजन उत्पादक आहेत. त्यापैकी ७ ते ८ उत्पादक आघाडीचे आहे. राज्यात दररोज १,२३७ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होतो. मुंबईत दररोज १०,००० कोव्हीड केसेस आढळून येत आहेत. त्यापैकी दररोज १ ते १.५०० लोकांना ऑक्सिजनची गरज भासते. आजच्या घडीला ८,४८१ लोक ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.

८० टक्के राखीव....

दिवसेंदिवस वाढती प्राणवायूची गरज लक्षात घेता, राज्य सरकारने कारखाने आणि उत्पादकांना ८० टक्के ऑक्सिजन हा वैदयकीय तसेच फार्मास्युटीकल्ससाठी राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकार काय म्हणते?

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे इंडस्ट्रीयल क्षेत्रावर दूरगामी परिणाम होतील, असेही सांगितले आहे. वाढती मागणी लक्षात घेता सिलेंडर्स आणि ऑक्सिजन कंत्राटदारांच्या दरातही वाढ झाली आहे. ३ ते ५००० असलेले सिक्युरिटी डिपॉसिट आता ८ ते १० हाजारांवर येऊन ठेपले आहे. देशातील कोरोना केसेसचे वाढते प्रमाण लक्षात घेता, अन्न आणि औषध प्रशासनाने ऑक्सिजनची मागणीत वाढ होण्याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

वाहतूक करताना थोडे ऑक्सिजन वाया जाते. रोज १२५० मेटन ऑक्सिजन तयार करणे शक्य नाही. जर दररोज ९०० ते १००० मे टन तयार केल्यास चिंता करण्याची गरज आहे. असे मेडिकल एज्युकेशन आणि ड्रग्जचे स्टेट सेक्रेटरी सौरभ विजय यांनी सांगितले.

४ रुग्णांचा मृत्यू.....

नागपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी कोविड रुग्णांना घरी सोडले. त्यापैकी ऑक्सिजनचा साठा संपल्यावर ११ रुग्ण गंभीर अवस्थेत होते. आरोग्य विभागाला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करण्यात अपयश आले. त्यापैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला. ७४ वर्षीय महिला हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत ती ऑक्सिजन सपोर्टवर होती, असे हॉस्पिटलर्फे सांगण्यात आले. उरलेले तिघांचे जवळच्याच खासगी आणि शासकीय रुग्णालयात निधन झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.