ETV Bharat / state

मुंबईत आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा - आयसीयू बेड तुटवडा

मुंबईत पालिका, सरकारी, खासगी तसेच कोविड सेंटरमध्ये 29 हजार 997 बेड्स आहेत. त्यापैकी 8 हजार 959 बेड्स रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या 11 हजार 124 बेड्स आहेत. त्यापैकी 1 हजार 97 बेड्स रिक्त आहेत. आयसीयूच्या 2 हजार 849 बेड्स आहेत. त्यापैकी 51 बेड्स रिक्त आहेत तर व्हेंटिलेटरच्या 1 हजार 451 बेड्स आहेत त्यापैकी फक्त 19 खाटा रिक्त आहेत.

व्हेंटिलेटरचा मुंबईत तुटवडा
व्हेंटिलेटरचा मुंबईत तुटवडा
author img

By

Published : Apr 28, 2021, 8:12 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असताना आयसीयूचे 51, व्हेंटिलेटरचे फक्त 19 बेड रिक्त आहेत, तर 1096 ऑक्सिजनचे बेड रिक्त आहेत. मुंबईत रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये एकूण 8959 बेड्स रिक्त आहेत. मुंबईत लवकरच 4 जम्बो कोविड सेंटर उभारली जाणार आहेत. त्यात 5 हजार 300 बेड आणि 800 आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आयसीयू, व्हेंटिलेटरचा तुटवडा

मुंबईत पालिका, सरकारी, खासगी तसेच कोविड सेंटरमध्ये 29 हजार 997 बेड्स आहेत. त्यापैकी 8 हजार 959 बेड्स रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या 11 हजार 124 बेड्स आहेत. त्यापैकी 1 हजार 97 बेड्स रिक्त आहेत. आयसीयूच्या 2 हजार 849 बेड्स आहेत. त्यापैकी 51 बेड्स रिक्त आहेत तर व्हेंटिलेटरच्या 1 हजार 451 बेड्स आहेत त्यापैकी फक्त 19 खाटा रिक्त आहेत.

ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा

मुंबईत रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गेल्या आठवड्यात 6 रुग्णालयातील 168 रुग्णांना हलवण्यात आले आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पालिकेला प्रतिदिन देण्यात येत असलेला 235 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा कमी करण्यात येऊ नये असे प्रयत्न पालिकेकडून केले जात आहेत. ऑक्सिजन उत्पादन स्थळापासून त्याची वाहतूक आणि मुंबईतील सर्व कोरोना रुग्णालये व कोरोना केंद्र तसेच इतर रुग्णालयांमध्ये देखील त्याचे वितरण होईपर्यंतच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी महानगरपालिकेची पथके नेमण्यात आली आहेत. गुगल ड्राईव्हमध्ये ऑक्सिंजनची नोंद केली जात असल्याने वेळीच उपाययोजना करता येत आहेत.

रेमडेसिवीरचा मुबलक साठा

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे या इंजेक्शनचा राज्यात तुटवडा आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. मात्र, मुंबई महापालिकेकडे 22 हजार रेमडेसिवीर इजेक्शनचा साठा आहे. 2 लाख इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे ७५ हजार इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.

6 लाख 35 हजार कोरोनाग्रस्त

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 35 हजार 541 वर पोहचला आहे. आज 59 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 912 वर पोहचला आहे. 8 हजार 240 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 55 हजार 101 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 66 हजार 045 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 68 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 111 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 131 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज(बुधवार) 30 हजार 428 तर आतापर्यंत एकूण 53 लाख 02 हजार 490 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

23 लाख 55 हजार लाभार्थ्यांना लस

मुंबईत आतापर्यंत एकूण 23 लाख 55 हजार 215 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 19 लाख 20 हजार 025 लाभार्थ्यांना पहिला, तर 4 लाख 35 हजार 190 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 2 लाख 79 हजार 580 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 21 हजार 061 फ्रंटलाइन वर्कर, 9 लाख 32 हजार 663 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 8 लाख 21 हजार 911 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.