मुंबई - कोरोनाने गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात डोके वर काढले आहे. नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने रुग्णसंख्येत दिवसागणिक भर पडत आहे. राज्यात सध्या ४ हजार ४८५ संशयित रुग्ण आहेत. वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. त्या तुलनेत सुमारे ३ हजार २३५ लस राज्याकडे उपलब्ध आहेत. संख्या वाढत असली तरी लसची मात्रा उपलब्ध होत नसल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढू लागले - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. शुक्रवारपर्यंत ९२६ बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अलर्टमोड आल्याची घोषणा केली. लसींची मात्रा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली जाईल, असे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले. मात्र राज्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी अपेक्षित लस पुरवठा होत नसल्याचे राज्य सरकारच्या कोविन अॅपवरून दिसून येत आहे.
कोविड लस घेतल्याची आकडेवारी - केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आतापर्यंत मिळालेल्या लसींमध्ये एकूण 1,77,958,526 लोकांनी लसीची मात्रा घेतली. अठरा वर्षावरील 8 कोटी 46 लाख 61 हजार 641 मुलांना पहिला डोस घेतला. तर 7 कोटी 16 लाख 48 हजार 80 तरुणांनी दुसरा डोस घेतला आहे. 15 ते 18 वयोगटातील 41 लाख 18 हजार 935 तरुणांनी पहिला आणि 31 लाख 8 हजार 622 दुसरा डोस घेतला आहे. 12 ते 14 वयोगटातील 28 लाख 90 हजार 846 मुलांनी पहिला तर 18 लाख 70 हजार 101 मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 59 वर्षापर्यंत 51 लाख 78 हजार 408 नागरिकांनी पहिला तर 44 लाख 81हजार 843 जणांनी दुसरा डोस घेतल्याची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
राज्यातील सर्व निर्बंध उठवले - मागील दोन वर्ष राज्य सरकारने कोरोनाचा सामना केला. कोरोना आटोक्यात आल्यानंतर राज्यातील सर्व निर्बंध उठवले. राज्याचा गाडा पूर्वपदावर आला असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. सत्या चार हजार 485 संशयित रुग्ण आहेत. या तुलनेत राज्यातील लसींची मात्रा किती उपलब्ध आहे याबाबत www.cowin.gov.in या सरकारच्या वेबसाईटवरून आढावा घेतला असता महाराष्ट्रात 3235 लसींचा साठा ८ एप्रिल २०२३ पर्यंत शिल्लक असल्याचे दिसून येते. त्यापैकी ३३ डोस आज दिवसभरात वापरात आल्याचे संकेतस्थळावरून दिसून येते.
सध्या लस साठा असलेले जिल्हा
अहमदनगर - 1
गडचिरोली - 101
मुंबई - 37
नांदेड - 1
पालघर - 298
पुणे - 1621
सोलापूर - 15
ठाणे - 1161