मुंबई - रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचा मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभागात तुडवडा होत असल्याचा आरोप मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. विशेष म्हणजे याच भागात शिवसेनेचे २ मंत्री वास्तव्यास आहेत. तरीही या गोळ्या वाटपाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे,
एच पूर्व पालिका विभागाच्या घन कचरा विभागातील कर्मचाऱ्यांकडून आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक गोळ्यांची मागणी वाढू लागली. त्यामुळे सदर विभागाच्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना 1000 आर्सेनिक 30 गोळ्यांचे वाटप करण्याची मागणी चित्रे यांच्याकडे केली.
त्यानुसार चित्रे यांनी आज मागणीनुसार पुन्हा एकदा त्या गोळ्यांचा पुरवठा केला. मात्र याच भागात शिवसेनेचे दोन मंत्री, 6 नगरसेवक राहत असताना या गोळ्यांचा तुटवडा होणे ही चिंतेची गोष्ट असल्याचे चित्रे यांनी सांगितले.