..तर फलटणपासून ते माळशिरसपर्यंत बुथवर एकही माणूस ठेवणार नाही - निंबाळकर
सोलापूर- माझ्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला तरी फलटण पासून ते माळशिरसपर्यंत बूथवर एक माणूस ठेवणार नाही, असे वक्तव्य माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजित नाईक-निबाळकर यांनी केले. माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निमगाव या गावातील सभेत रणजित निंबाळकर यांनी हे वक्तव्य करत संजय शिंदेवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही टीकास्त्र सोडले. वाचा सविस्तर
या वयात पाय आणि मांड्या पहायची वेळ येऊ देऊ नका; शरद पवारांची मोहिते पाटलांवर टीका
सोलापूर - या वयात तुमच्या मांड्या आणि पाय पाहण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर केली. विजय दादा तुम्ही आमचे सहकारी होतात, त्यामुळे काहीही करा पण हाफ पॅन्ट हाफ शर्ट आणि डोक्यावर काळी टोपीच्या पेहरावात आमच्यावर पाय आणि मांड्या पाहायची वेळ येऊ देऊ नका, अशी टीका करत रणजितसिंह मोहिते पाटलांचाही पवार यांनी समाचार घेतला.वाचा सविस्तर
मतदान करताना चिट्टी बगा, नाहीतर मत भाजपला जाईल - शरद पवार
सातारा - बटन दाबल्यावर चिठ्ठी बघा कोणती येते, काल देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांनी तक्रार केली आहे. कारण, मोदी साहेब काय करतील याचा नेम नाही. या मशीनमध्ये गंमती करता येतात. पण आयुष्याची गंमत व्हायची नसेल तर चिठ्ठी तपासून बघा. पहिलं शिक्याचं मतदान बरं होत, समजायचं तरी पण हे खूप किचकट असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले. ते माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ माण तालुक्यात बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी उपस्थित होते.वाचा सविस्तर
निवडणूक असली तरी शिवसेना दुष्काळ विसरली नाही - उद्धव ठाकरे
औरंगाबाद - दुष्काळ महत्वाचा आहे, निवडणुकीत आम्ही दुष्काळ विसरलो नाही. मतदान झाल्यावर लगेच दुष्काळाची कामे शिवसैनिक सुरू करतील, तसे आदेश मी शिवसैनिकांना करतो आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही विनंती करतो, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत केले. महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानात सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते.वाचा सविस्तर
राजकारण्यांऐवजी साधू संतांची लोकसभा करण्याचा भाजपचा विचार - सुशीलकुमार शिंदे
कोल्हापूर - राजकारण्यांऐवजी साधू संतांची लोकसभा करण्याचा भाजपचा विचार दिसतोय, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. ते शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. सोलापूरला माझ्याविरुद्ध एक साधू आणि मध्यप्रदेशमध्ये साध्वी आहे. साधू आणि साध्वी यांचे एकत्रीकरण करून लोकसभा करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माझ्या मनात भीती असल्याचेही शिंदे म्हणाले. वाचा सविस्तर
प्रज्ञा सिंह ठाकूरला उमेदवारी देणं ही भाजपची बौद्धिक दिवाळखोरी - एकनाथ गायकवाड
मुंबई - साध्वी प्रज्ञा ठाकूरला लोकसभा निवडणुकीत उभे करणे ही भाजपची बौद्धिक दिवाळखोरी आहे. हुतात्मा हेमंत करकरेंचा अपमान देश सहन करणार नाही. जनता निश्चित भाजपला धडा शिकवील. मोदींचा प्रचारही भरकटला आहे, अशी टिका मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात केली. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते.वाचा सविस्तर
साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर मोदींनी भारतीयांची माफी मागावी - सचिन सावंत
मुंबई - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भारतातील शहिदांचा अपमान झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. काँग्रेस प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वाचा सविस्तर
काँग्रेस देशात अंबानींचे सरकार आणू पाहत आहे का? भाजपचा सवाल
मुंबई - मुकेश अंबानी जर काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करत असतील तर काँग्रेस अंबानींचे सरकार आणू पाहत आहे का? असा सवाल भाजपने केला आहे. मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबईचे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांत फिरत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली.वाचा सविस्तर