ETV Bharat / state

धक्कादायक..! 18 टक्के मुंबईकरांमध्ये कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या अँटीबॉडीज तयार - मुंबईत कोरोनाचा प्रसार

कोरोना विषाणूची लागण 18 टक्के मुंबईकरांना झाली आहे. मुंबईमधील या 18 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का ते पाहण्यासाठी थायरोकेयर लॅबने सेरो टेस्ट केल्या आहेत. त्यामधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. देशभरात 18 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता या लॅबने वर्तवली आहे.

Fight with corona
कोरोनाचा मुकाबला
author img

By

Published : Jul 24, 2020, 1:12 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची लागण 18 टक्के मुंबईकरांना झाली आहे. मुंबईमधील या 18 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का ते पाहण्यासाठी थायरोकेयर लॅबने सेरो टेस्ट केल्या आहेत. त्यामधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा अर्थ या लोकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्याची त्यांना माहितीच नव्हती, असे थायरोकेअरचे उपाध्यक्ष डॉ. सिजर सेनगुप्ता यांनी "ई टीव्ही भारत" ला दिली. देशभरात 18 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता या लॅबने वर्तवली आहे.

थायरोकेअर लॅबचे डॉ. सिजर सेनगुप्ता

मुंबई कोरोना विषाणूची हॉटस्पॉट बनली आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रसार झाला आहे का याची माहिती मिळवण्यासाठी थायरोकेअर लॅबने मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. आरोक्या स्वामी वेलुमानी यांच्या मार्गदर्शनाखाली अँटीबॉडीज टेस्ट केल्या आहेत. याबाबत माहिती देताना ,26 जून पासून टेस्टला सुरुवात केली. त्यावेळी आम्ही 500 ते 600 टेस्ट करत होतो. आता दिवसाला 3 हजार ते 3500 टेस्ट करत आहोत. आतापर्यंत आम्ही 74 हजार टेस्ट केल्या आहेत. यामध्ये 18 टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या लोकांमध्ये कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. गंभीर बाब ही आहे की या लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, त्याची माहितीच या लोकांना नाही.

या लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या म्हणजे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढली असे नाही. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार रोगप्रतिकार शक्ती आयुष्यभर समान नसते, त्यामुळे लोकांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. सिजर सेनगुप्ता यांनी सांगितले. थायरोकेअर लॅबच्या सर्वेक्षणानुसार सुमारे 10 हजार मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली होती, ते त्यामधून चांगलेही झाले. मात्र, त्यांना त्याची माहितीही नाही असे समोर आले आहे. थायरोकेअरने केलेल्या अँटीबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत 32.15 टक्के, घाटकोपरला 36.7 टक्के, सांताक्रुजमध्ये 31.45 टक्के तर बांद्रा पश्चिमेला 18 टक्के मुंबईकरांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.

थायरोकेअर लॅबचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. आरोक्या स्वामी वेलुमानी यांनी देशभरात 18 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला असल्याची शक्यता वर्तवली आहे. थायरोकेयरने भारतातील सहाशे ठिकाणाहून 60 हजाराहून अधिक सॅम्पल्स तपासली गेली आहेत. यामधून 15 टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे, आणि त्यातून ते आपोआप बरेही झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. आय.सी. एम. आरच्या परवानगीनंतर सरकारी प्रयोगशाळा बरोबरच खाजगी प्रयोगशाळांनी एका महिन्यात केलेल्या निरीक्षणातील हा अहवाल असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी थायरोकेअर लॅब रिपोर्टच्या आधारे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून एक लाख लोकांची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

पालिकेचा अहवाल येणे बाकी -

मुंबई महापालिका आणि टाटा इस्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च यांच्यासोबत मुंबईतील काही भागात सेरो सर्वेक्षणाच्या माध्यमातून 10 हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी कस्तुरबा मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅब आणि ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट फरिदाबादला पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अजून येणे बाकी आहे.

काय आहे सेरो सर्वेक्षण -

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रक्ताचे नमुने घेतल्यानंतर रक्तातील अॅण्टीबॉडीजची तपासणी करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामुळे कोरोनाची लागण होणे, कोरोनाचा फैलाव लोकांमध्ये कशा प्रकारे झाला याबाबत माहिती उपलब्ध होणार असून सार्वजनिक आरोग्याच्या धोरणात्मक निर्णयासाठी महत्त्व पूर्ण ठरणार असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.