मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देशभरातील शिवसैनिक शिवसेना भवनात दाखल झाले. प्रादेशिक पक्ष सत्तेवर यायला पाहिजेत, भाजपच्या दबावाच्या राजकारणाला उखडून टाकण्याची ही सुरुवात असून ती शिवसेनेने सुरू केली असल्याचे हरियाणा आणि केरळच्या शिवसैनिकांनी सांगितले.
हेही वाचा - हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं' - संजय राऊत
शिवसेनेकडून परप्रांतियांना योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप केला जातो. मात्र, हरियाणा आणि केरळ राज्यातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विश्वास दाखवला आहे. ते म्हणाले, प्रत्येक नागरिक शिवसेनेसोबत जोडला जाऊ इच्छितो आणि शिवसेनेसोबत देशाला प्रगती पथावर नेऊ इच्छितो. संपूर्ण देशात शिवसेनेशी लाट यावी, अशी इच्छा आहे, असे दक्षिण हरियाणाचे शिवसेना प्रमुख विक्रम सिंग यादव यांनी म्हटले.
तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यामुळे इतर राज्यात शिवसेनेला देशभर नेण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली असल्याचे केरळचे शिवसैनिक हरिकुमार म्हणाले.
हेही वाचा - जयंत पाटील आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार