ETV Bharat / state

शेतकऱ्यांना खुनी ठरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा प्रवास ऱ्हासाच्या दिशेने - शिवसेना

हरियाणातील खट्टर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर सूडभावनेने खट्टर सरकारकडून काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांवर हत्या करण्याचा प्रयत्न आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याची गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावरून शेतकरी हे खुनी आणि नक्षलवादी नाहीत, त्याच्यावर गुन्हे दाखल करणे म्हणजे सत्ताधाऱ्यांचा ऱ्हासाच्या दिशेने प्रवास सुरू झाला असल्याची सडकून टीका केली आहे.

saamana editorial on khattar
शेतकऱ्यांना खुनी ठरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा प्रवास ऱ्हासाच्या दिशेने
author img

By

Published : Dec 25, 2020, 9:21 AM IST

मुंबई - केंद्र सरकारने मंजूरी दिलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ३० दिवसांपासून पंजाब हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलकांकडे लक्ष न देता स्वानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या प्रचारसाठी जाणाऱ्या मनोहरलाल खट्टर यांचा ताफा संतप्त शेतकऱ्यांनी अडवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर या शेतकऱ्यांवर हत्या करण्याचा प्रयत्न आणि दंगलीसह असे एकाहून एक गंभीर कलमे शोधून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यावरून शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून हरियाणाचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

काय म्हटले आहे सामनात-

कृषी प्रधान देश असे बिरूद मिरवणाऱ्या देशातील शेतकरी खूनी, आतंकवादी नक्षलवादी आहेत का? केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात आंदोलन करने गुन्हा आहे. मात्र, हरियाणातील सत्ताधारी पक्ष आणि केंद्र सरकारातील नेते मंडळी या आंदोलनाला तसेच रुप देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारच्या या प्रयत्नाला शेतकऱ्यांनी धुळ चारली असल्याचा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

लोकप्रियतेनंतर उतरती कळा लागून ऱ्हासाच्या दिशेने प्रवास-

हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाचा जोर अधिक आहे. हरयाणातील खट्टर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा ताफा अडवण्यात आला. यानंतर सूडभावनेने खट्टर सरकारकडून काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांवर हत्या करण्याचा प्रयत्न आणि दंगलीसह कायद्याच्या पुस्तकातील एकाहून एक गंभीर कलमे शोधून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे म्हणजे लोकप्रियता घटल्यानंतर उतरती कळा लागून ऱ्हासाच्या दिशेने सुरू झालेला हा प्रवास आहे असेच म्हणावे लागेल, अशी टीकाही शिवसेनेने हरियाणातील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्या प्रकरणी केली आहे.

खट्टर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. अर्थात, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांच्या ताफ्याने दुसऱ्या मार्गाने मुख्यमंत्री खट्टर यांना प्रचाराच्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहचविले. पण या घटनेनंतर सूडाने पेटलेल्या खट्टर सरकारने जी कारवाई केली ती संतापजनक असल्याची टीकाही सामनातून करण्यात आली आहे.

हातात शस्त्र घेण्याचा विचार केला नाही-

या देशातील शेतकरी मारेकरी आणि दंगलखोर असूच शकत नाही. तो अन्नदाता आहे, तो सोशिक आहे. अस्मानी आणि सुलतानी अशा तमाम संकटांशी दोन हात करत वर्षानुवर्षे तो संघर्ष करतो आहे. आपल्या लाखो शेतकरी बांधवांनी आत्महत्या करूनही त्याने कधी हातात शस्त्र घेण्याचा विचार केला नाही. अडचणींचा डोंगर आणि कर्जाचा ताण असह्य झाला तेव्हा त्याने गळफास घेतला, विषप्राशन केले; पण त्याने कधी कोणाचा जीव घेतला नाही. अशा वेळी आंदोलक शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसते? असा सवाल ही शिवसेनेने केला आहे.

हरियाणा आणि केंद्रातील सत्ताधिशांना इशारा-

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा हरेक प्रयत्न सरकारने केला. सर्वशक्तिमान मोदी सरकारला गदागदा हलवून देशभर रान उठवण्याचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. खुनाच्या प्रयत्नाचे आणि दंगलीचे खोटे गुन्हे दाखल करून बळीराजाचा हा संघर्ष मिटवता येणार नाही. हे हरयाणा आणि केंद्रातील सत्ताधिशांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आला आहे.

..तर शेतकरी क्षणात तख्त पालटू शकतात-

शेतकऱ्यांनी ठरवले तर ते सत्ताधाऱ्यांना क्षणात झुकवू शकतात. मात्र त्यांनी अजून संयम कायम ठेवला आहे. त्यांच्या सरळ मागण्या आहेत की शेतकरी विरोधी असलेले केंद्र सरकारचे तीन कायदे रद्द करावेत. शेतकऱ्यांना गुलामीकडे ढकलणारे कायदे रद्द केल्या शिवाय हे आंदोलन आता थांबणार नाही. आणि जर तसा इशारा जर आंदोलक शेतकरी देत असतील तर चुकीचे काय आहे? असा प्रश्न शिवसेनेने हरियाणा आणि केंद्रातील सत्ताधिशांना केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.