ETV Bharat / state

Shivsena Political Crisis : 'शिवसेना कोणाची' सुनावणीला सुरुवात, ठाकरे गटाच्या आमदारांना बोलावणं नियमबाह्य - भास्कर जाधव यांचा दावा - भरत गोगावले

Shivsena Political Crisis : राज्यातील सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय विधानसभा अध्यक्षांच्यावर टाकलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटांची सुनावणीला सुरुवात होतेय. ठाकरे गटाचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार विधानभवनात येण्यास सुरुवात झालीय.

Shivsena Political Crisis
शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटांची सुनावणी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 4:02 PM IST

शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटांची आज सुनावणी

मुंबई Shivsena Political Crisis : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांच्या दालनात थोड्या वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया देतानी म्हटलंय की, सुनावणीच्या दरम्यान आमचे वकील बाजू मांडतील. सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं विधानसभा अध्यक्षांना सांगितलंय. त्यामुळं लोकशाहीनं मला दिलेल्या अधिकारानं मी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एक प्रतिज्ञापत्र देत आहे की, आजच्या दिवशी आपण ही सुनावणी संपवून टाकावी. याबाबतचा निर्णय घ्यावा. या निर्णयाबद्दल राज्याला आणि देशाला मोठी उत्सुकता लागून आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा विषय : सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार वेळेत सुनावणी व्हायला हवी होती. मात्र, वेळकाढूपणा केला गेलाय. 11 मे 2023 रोजी सुप्रीम कोर्टानं शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा विषय पूर्ण व्हायला हवा होता असं म्हटलं. तो अद्याप होऊ शकला नाही. सर्वोच्च न्यायालयानं केवळ रेडिमेड निर्णय दिलाय. त्या संदर्भातील घोषणा लवकरात लवकर होईल, अशी अपेक्षा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलीय. (Maharashtra Political Crisis)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अधीक्षेप : ठाकरे गटाच्या आमदारांना आजच्या सुनावणीबाबत नोटीस योग्य नसल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केलाय. शिंदे गटाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती शिंदे गटानं सुचवली. विधानसभा अध्यक्षांनी ती नेमणूक केली. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आपलं मत स्पष्टपणे नोंदवलं आहे. भरत गोगावले यांची नेमणूकच ही नियमबाह्य आहे. खरे पक्षप्रतोद सुनील प्रभूच आहेत. त्यामुळं भरत गोगावले यांचं कायदेशीर अस्तित्व संपलेलं आहे. आम्हाला नोटीस काढणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अधीक्षेप आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना बोलावणं नियमबाह्य असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलाय. (hearing of Shinde and Thackeray group)

मुख्यमंत्री येऊ शकणार नाहीत : थोड्या वेळात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सुनावणीला सुरुवात होतेय. वकीलामार्फत आम्ही आमची बाजू विधानसभा अध्यक्षांसमोर मांडणारच आहोत. दोन-तीन आमदार सुनावणीसाठी दालनात गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्याला गेल्यानं ते येऊ शकणार नसल्याची माहिती गोगावले यांनी दिलीय. मला असं वाटतंय की, आज निर्णय होणार नाही. कारण, दोन्ही बाजू ऐकून घेवून कागदपत्रं तपासणी ही मोठी प्रक्रिया आहे. पुढची तारीख काय असेल, हे आत्ता सांगू शकत नाही, मात्र सुनावणीच्या दरम्यान समजेल.

हेही वाचा :

  1. SC Hearing on Shivsena : शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष कोणाचा? सुनावणी दोन मिनिटात होऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायालय
  2. Political Crisis In Maharashtra : राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालावर नाना पटोले यांचे मोठे विधान
  3. Maharashtra Political Crisis : एकीकडे आघाडी सरकार अल्पमतात; दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.