मुंबई - कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडची जागा आपल्या मालकीचा असल्याचा दावा केंद्राने केला. केंद्राच्या या दाव्यानंतर केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे. या विषयावरून अनेक राजकीय नेते टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत आहेत. आता त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? असा संतप्त सवाल राऊत यांनी केंद्र सरकारला विचारत, मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच आहे. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार, असे ठणकावले आहे.
काय आहे प्रकरण –
राज्य सरकारने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा प्रस्ताव पारित केला. यानंतर कारशेडचे कांजूरला हलवण्यात आले. तिथे कारशेडचे कामही सुरू झाले. तेव्हा कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडची जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करत तेथील कारशेडचे काम थांबविण्याची सूचना केंद्राने राज्य सरकारला पत्राद्वारे केली. तसेच या पत्रात, कांजूरच्या त्या जागेवर कोणी काम केल्यास कारवाईचा इशारा देखील दिला आहे.
संजय राऊत काय म्हणाले...
कांजूरच्या त्या कारशेडच्या जागेवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष पेटला आहे. या विषयावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच आहे. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया. जय महाराष्ट्र.'
-
महाराष्ट्राच्या सात बारा वर दिल्लीचे नाव कोणी लावले?
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मुंबईची इंच इंच जमीन फकत महाराष्ट्राचीच. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया.
जय महाराष्ट्र!!
">महाराष्ट्राच्या सात बारा वर दिल्लीचे नाव कोणी लावले?
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 4, 2020
मुंबईची इंच इंच जमीन फकत महाराष्ट्राचीच. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया.
जय महाराष्ट्र!!महाराष्ट्राच्या सात बारा वर दिल्लीचे नाव कोणी लावले?
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 4, 2020
मुंबईची इंच इंच जमीन फकत महाराष्ट्राचीच. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया.
जय महाराष्ट्र!!
राज्य सरकार आक्रमक
या विषयावरून राज्य सरकारने केंद्रविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कांजूरची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा करत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कारशेडचे बांधकाम सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. तसेच केंद्र सरकारच्या त्या दाव्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी, हा केंद्र सरकारचा डाव असल्याचे सांगत, संताप व्यक्त केला आहे.