मुंबई - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला श्रद्धांजली वाहिली.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी "पहेले मंदिर फिर सरकार" अशी घोषणा केली होती. तर, आता मंदिराचा निर्णय लागला आहे आणि सरकारचा निर्णयही लवकरच लागेल. राम मंदिराच्या निर्णयाप्रमाणे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सरकारबाबतही योग्य निर्णय घेतील, असे वक्तव्य खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे.