ETV Bharat / state

कलाबेन डेलकर यांच्या रुपाने शिवसेनेची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री

प्रादेशिक आणि महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या शिवसेना पक्षाने कलाबेन डेलकर यांच्या रुपाने राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री केली आहे. दादरा नगर हवेली येथील पोटनिवडणूक सेनेने तब्बल 40 हजार मतांनी विजय मिळवला आहे. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरील पहिल्या खासदार ठरल्या.

शिवसेना
शिवसेना
author img

By

Published : Nov 2, 2021, 7:46 PM IST

मुंबई - प्रादेशिक आणि महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या शिवसेना पक्षाने कलाबेन डेलकर यांच्या रुपाने राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री केली आहे. दादरा नगर हवेली येथील पोटनिवडणूक सेनेने तब्बल 40 हजार मतांनी विजय मिळवला आहे. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरील पहिल्या खासदार ठरल्या.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रीय राजकारणाबाबत संकेत दिले होते. शिवसेनेला आपला पक्ष राज्याबाहेर वाढवायचा आहे. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले होते. पण, त्यांना तेथे यश आले नव्हते. मात्र, डेलकर यांच्या रुपाने शिवसेनेचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला आहे.

गोव्यात सर्व जागांवर लढवणार निवडणूक

शिवसेनेने काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेसाठी 403 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. असे झाले तर भाजपची डोकेदुखी वाढू शकते. दुसरीकडे गोव्यामध्येही सर्व जागा लढवू, असे संजय राऊत यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे गोव्यात शिवसेना तयारीलाही लागली आहे. यामुळे राज्याबाहेरही पक्ष वाढताना दिसत आहे.

मुंबईत जल्लोष

शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत या विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी शिवसेनेच्या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. आपला पक्ष बाकीच्या राज्यातही वाढत आहे. याचा आनंद कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

हेही वाचा - दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेच्या कलाबेन डेलकर विजयी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.