ETV Bharat / state

'शिवसेना राममंदिराच्या मुद्द्यावर अजूनही ठाम'

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. शिवसेना राममंदिराच्या मुद्द्यावर अजूनही ठाम आहे. विशेष कायदा करा आणि राम मंदिर उभारा ही शिवसेनेची मागणी आहे. असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्या दरम्यान म्हटले आहे.

Shiv sena
author img

By

Published : Oct 8, 2019, 9:45 PM IST

Updated : Oct 8, 2019, 11:42 PM IST

मुंबई - शिवसेना राममंदिराच्या मुद्द्यावर अजुनही ठाम आहे. विशेष कायदा करा आणि राम मंदिर उभारा ही शिवसेनेची मागणी आहे. असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्या दरम्यान म्हटले आहे. यावेळी विधानसभेच्या प्रचाराचे बिगुल वाजवत शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवर खरपुस टीका केली. मात्र, यावेळी आरे प्रकरणाचा उल्लेख करणे त्यांनी टाळले.

या शिवसेनेने भगवा दिलाय आणि तो रंग घेऊन मी पुढे निघलो आहे. भगवा फडकवण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो आहे. राम जन्मले होते की नाही यावर वाद चालू आहे. असे कुठेच जगात चालले नसेल. या महिन्यात न्यायालयाने निकाल दिला तर आनंद आहेच. आम्हाला या देशात राम मंदिर पाहिजे. शिवसेना भाजप युती आहे. आमचा कारभार प्रभू रामचंद्र सारखा आहे. राम मंदिर बांधायचे आणि वचन तोडायचे हे आम्हाला पटत नाही. धनुष्यबाण निशाण घेतले तेव्हा राम मंदिर हा विषयही नव्हता. आजही आमची मागणी आहे की विशेष कायदा करून राम मंदिर बांधा. प्राण जाये पण वचन न जाये ही शिवसेनेची नीती, असे उद्धव यांनी यावेळी सांगितले.

मागील 30 वर्ष राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर बोलू नका असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. तसेच शिवसेनेच नाव न घेता राममंदिर प्रकरणी बडगोले अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत केली होती. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नाव न घेता अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले की, या महिन्यात कोर्टाने राम मंदिराचा निर्णय दिल्यास त्याचे स्वागत आहे. राम मंदिर बांधायचे आणि वचन तोडायचे हे आम्हाला पटत नाही. त्यामुळे आम्हाला या देशात राम मंदिर पाहिजेच असे उध्दव ठाकरे म्हणाले.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्या प्रचारात राम मंदिराचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे अशी रि ओढली. कोर्टाला दसऱ्याची सुट्टी असते. 15 दिवसानंतर दिवाळी येते, त्या दिवशी पण कोर्टाला सुट्टी असते. राम जन्मले होते की नाही यावर वाद चालू आहे, असे कुठेच जगात चालले, नसेल असे कोर्टाला उध्दव ठाकरे यांनी राम मंदिर प्रश्नी सुनावले.

शिवसेनेने धनुष्यबाण निशाण घेतलं तेव्हा राम मंदिर हा विषयही नव्हता. आपल्या देशावर प्रेम करणारे मुसलमान देखील आहेत. आमचा कारभार प्रभू रामचंद्र सारखा आहे. राम मंदिर बांधायचं आणि वचन तोडायचे हे आम्हाला पटत नाही त्यामुळे राम मंदिर प्रश्न निकाली निघालाच पाहिजे. राम मंदिर अयोध्येत झालं पाहिजे असे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सांगितले.
शिवसेनेने शेतकऱ्यांचा पीक विमा प्रश्न उचलून धरला. त्यानंतर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही तर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार असून सत्ता आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेच्या वचननाम्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अग्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वचननाम्याची घोषणा केली. यात गोर गरिबांसाठी 10 रुपयांत सकस आहाराची थाळी शिवसेना उपलब्ध करून देणार आहे. तसेच घरगुती 300 युनिट पर्यंतचा विजेचा दर शिवसेना कमी करण्यात येईल. सदृढ महाराष्ट्र करण्यासाठी एक रुपया मध्ये आरोग्य चाचणी केंद्र उभारले जाईल. महिला भगिनींच्या सुरक्षिततेसाठी बस सेवा सुद्धा शिवसेना देणार असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

Intro:Body:
mh_mum_shivsena_ud1_dasera_melava_mumbai_7204684

तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यात पाणी : उध्दव ठाकरेंचा विरोधकांना टोला

मुंबई : विधानसभेच्या प्रचाराचे बिगुल वाजवत शिवतिर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी कॉंग्रेस राष्ट्रवादीवर खरपुस टिका केला. जे शस्त्र विरोधकांनी शिवसेनेवर उगारलं तेच अस्त्र तेच शस्त्र यांनी तुम्हाला संपवलेल आहे असं उध्दव ठाकरे म्हणाले.

अजित पवारांवर टिका करताना उध्दव ठाकरे म्हणाले, मगरीच्या डोळ्यात अश्रू हे ऐकले होते. परंतु अजित पवारांच्या रूपाने मी ते अश्रू पाहिले. राजकारण सोडून शेती करणार बोलता.अजित पवार तुमच्या डोळ्यात पाणी आहे पण धरणात पाणी नसणार तर काय करणार ? तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यात पाणी आलेले आहे असं ते म्हणाले.

जय शस्त्र तुम्ही शिवसेनेवर उगारलं तेच अस्त्र तेच शस्त्र यांनी तुम्हाला संपवलेल आहे. प्रत्येक निर्णय घेताना माझ्या मनात एकच विचार असतो की माझ्या शिवसैनिकाला काय वाटेल.
तुम्ही ठेवलेला विश्वासा बद्दल मी खूप मनापासून शिवसैनिकांचे आभार मानतो.

सुडाचे राजकारण जर कोणी करायला गेले तर त्याला तोडून मोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही.

सामना वाचाल तर तुम्हीदेखील वाचाल.
शिवसेनाप्रमुख स्वतः कोर्टात हजर झाले आणि कोर्टाने सांगितले की ही केसच होऊ शकत नाही. मागील सर्व अनुभव पाहून मी का बरे भाजपा सोबत युती करायची नाही ? राम मंदिर पूर्ण करण्याचे काम शिवसेना करणार. शिवसेनाप्रमुखांचे विचार आज पुर्ण जगाला पटायला लागले आहेत.
ट्रम्प यांना शिवसेनाप्रमुखांचा पवित्रा कळला की भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत असं ठाकरे म्हणाले.Conclusion:
Last Updated : Oct 8, 2019, 11:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.