ETV Bharat / state

चीनचा हल्ला..! पंतप्रधान जनतेसमोर न येणे धक्कादायक; सामनातून मोदींची कानउघडणी - भारत व चीनच्या सैनिकांमध्ये हाणामारी

लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी (दि. 15 जून) रात्री व मंगळवारी (दि. 16 जून) भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील 20 जवानांना वीरमरण आले. यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके सीमेवर काय झाले हे सांगण्यासाठी जनतेसमोर येत नाहीत, हे धक्कादायक असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

pm modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jun 18, 2020, 8:26 AM IST

मुंबई - अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणार्‍या चीनची स्वतःची एक जागतिक फळी आहे. चीन साम्राज्यवादी आणि घुसखोर आहे. त्याने भारतावर आधीच अतिक्रमण केले आहे. लडाखच्या हद्दीत घुसून गलवान खोऱ्यात चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे. ‘गडबड सीमेवर नसून दिल्लीत आहे. दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो’, असे सहा वर्षांपूर्वी जोरकसपणे सांगणारे नरेंद्र मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश आहेत. त्यामुळे आज जे घडले, त्याचा प्रतिकार मोदींनाच करावा लागेल. चीनचे पंतप्रधान अहमदाबादला येऊन पंतप्रधान मोदींच्या झोपाळ्यावर ढोकळा खात बसले तेव्हाही याच स्तंभातून आम्ही इशारा दिलाच होता. “चिनी लाल माकडांवर विश्वास ठेवू नका! पंडित नेहरूंचा विश्वासघात झाला तसा तुमचाही होईल.” दुर्दैवाने तो झाला आहे, असे म्हणत शिवनेने मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघडणी केली.

मोदींचे जनतेसमोर न येणे धक्कादायक

भारत व चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी (दि. 15 जून) युद्ध झाले. हे युद्ध रक्तरंजित आहे. त्यात भारताचे 20 जवान शहीद झाल्याचे वृत्त संतापजनक आहे. पण, हे युद्ध नसून दोन देशांच्या सैन्यांत हाणामारी झाली असे सांगण्यात येत आहे. पण, हाणामारीत आमचे वीस जवान मारले जातात. चीनच्या बाजूचे चाळीसेक जवान मारले गेले असल्याचे वृत्त येते. म्हणजे दोन देश सीमेवर मिळेल त्या हत्याराने लढत आहेत. डोकी फोडत आहेत. कोथळे काढत आहेत. सीमेवर रक्ताचे सडे पडत आहेत. भारत-चीन सीमेवर हा संघर्ष व चढाया पन्नास वर्षांनंतर सुरू झाल्या व 20 जवानांच्या हौतात्म्यानंतरही देशाचे पंतप्रधान काय झाले ते सांगण्यासाठी जनतेसमोर येऊ नयेत हे धक्कादायक आहे.

...मग संरक्षण उपकरणे अन अणुबॉम्ब बनवायचे कशाला..?

या पूर्वी 1975 मध्ये चिनी सैन्य आपल्या अरुणाचल प्रदेशात घुसून गोळीबार केला होता. त्यात चार भारतीय सैनिकांना हौतात्म्य आले होते. त्यानंतर ही आता सगळ्यात भयंकर दंगल सीमेवर झाली आहे. कोणतेही हत्यार, बंदुका, क्षेपणास्त्र, रणगाडे न चालवता दोन्ही बाजूंनी इतकी प्रचंड सैन्यहानी होत असेल तर मग संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला? आपण अश्मयुगातील दगड-धोंड्यांच्या लढाईत एकमेकांचे जीव घेत आहोत. लडाखच्या सीमेवर तरी तेच दिसले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश अधिक मजबूत, खंबीर व लढाऊ बाण्याचा झाला, असे दावे सहा वर्षांत अनेकदा झाले. पण, या काळात पाकिस्तान, नेपाळ व आता चीनने भारतावर सरळ हल्ला केला आहे.

...आणि आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले

भारताच्या सीमेवरील एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत व आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले याचे आश्चर्य वाटते. नेपाळने भारताचा नकाशा कुरतडला आहे. पाकिस्तानची मस्ती सर्जिकल स्ट्राइकनंतरही कायम आहे. चीन तर एक फसवा आणि मायावी देश आहे. पण, नेपाळही भारताकडे वाकड्या नजरेने पाहत असेल, आव्हानाची भाषा करत असेल तर जगाचा नेता, महासत्ता वगैरे होऊ पाहणार्‍या आपल्या देशाची अवस्था बरी नाही हे मानावे लागेल.

चीनी क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात अमेरिका नाही आपला देश येतो

ट्रम्प व चीन यांचे भांडण कोरोनाच्या प्रसारावरून लागले आहे. पण, अमेरिका चिनी क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येत नाही, आपला देश येतो. तसेच चीन आपले सीमेवरील शेजारी राष्ट्र आहे हे विसरता येत नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी यांनी धगधगत्या सीमा शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तो यासाठीच. सीमेवरील संघर्षाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते. चीनबरोबर जो संघर्ष आज सुरू आहे त्याचे कूळ आणि मूळ पंडित नेहरूंच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणात आहे, असे जाहीर सभांतून सांगितल्याने टाळ्या मिळतील. पण, आज जवानांची बलिदाने सुरू आहेत ती थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे.

सध्या तणाव कोणालाच नको, प्रतिकार झालाच नाही तर मोदींच्या प्रतिमेस धक्का बसेल

पाकिस्तानला दम देणे, धमक्या आणि इशारे देणे, सर्जिकल स्ट्राइक करून राजकीय माहोल बनवणे सोपे आहे. कारण, पाकिस्तान हा देश नसून टोळी आहे, पण चीनचे तसे नाही. अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणार्‍या चीनची स्वतःची एक जागतिक फळी आहे. चीन साम्राज्यवादी आणि घुसखोर आहे. त्याने भारतावर आधीच अतिक्रमण केले आहे. लडाखच्या भारतीय हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे. दिल्लीत बैठका आणि चर्चा सुरू आहेत. तणाव कोणालाच नको आहे. सध्याच्या काळात तो कोणालाच परवडणारा नाही. पण, 20 जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे काय? प्रतिकार झालाच नाही तर मोदी यांच्या प्रतिमेस त्यामुळे धक्का बसेल.

हेही वाचा - 'मोदीजी समोर या..चीन विरोधात उभं राहायची हीच वेळ'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.