मुंबई - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे येत्या 19 फेब्रुवारीला शासकीय शिवजयंती साजरी करणार आहेत. मात्र शिवसेना तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करणार असल्याची माहिती शिवसेना नेते व कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी दिली .
गेल्या कित्येक वर्षांपासून एकच शिवजयंती साजरी व्हावी हा वाद होता. शिवसेना सत्तेत असली तरी आता वेळ कमी आहे. त्यामुळे यंदा तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार आहे. त्यानंतर शिवजयंती एकच साजरी करण्याबाबत निर्णय होईल, असे परब यांनी सांगितले.
हेही वाचा - 'काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर करत आहे'
मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नेमका काय आहे, यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थापन केलेली समिती अभ्यास करून निर्णय घेईल. आरक्षणाबाबत आम्ही कुठेही कमी पडणार नाही असेही परब यांनी सांगितले.
हेही वाचा - ..तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत