ETV Bharat / state

Sanjay Raut Vs Nitesh Rane : संजय राऊत यांच्या बदनामीचा खटला; नितेश राणेंना कोर्टाचं समन्स - नितेश राणेंना कोर्टाचा समन्स

Sanjay Raut Vs Nitesh Rane : संजय राऊत यांनी मुंबईच्या शिवडी न्यायालयामध्ये (Shivdi Magistrate Court) आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मानहाचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात संजय राऊत (Sanjay Raut) सुनावणी करता हजर राहिले. मात्र नितेश राणे (Nitesh Rane) हजर राहिले नाहीत. त्यामुळे नितेश राणेंना न्यायालयानं समन्स बजावलं आहे.

Sanjay Raut On Nitesh Rane
आमदार नितेश राणे व खासदार संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 7:05 PM IST

मुंबई Sanjay Raut On Nitesh Rane : आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात मानहानीकारक वक्तव्य केलं. त्यामुळे संजय राऊत यांची बदनामी झाली. अशा प्रकारचा खटला संजय राऊत यांनी मुंबईच्या शिवडी न्यायालयामध्ये दाखल (Shivdi Magistrate Court) केला होता. त्याबाबत 16 ऑक्टोबरला शिवडी न्यायालयात सुनावणी झाली. सुनवणीत नितेश राणे (Nitesh Rane) यांना न्यायालयानं समन्स जारी केलं आहे. 21 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवडी न्यायालयाचे न्यायाधीश एस बी काळे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

शिवडी न्यायालयात मानहानीचा खटला : नितेश राणे हे सातत्यानं वादग्रस्त विधान करत असतात. त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप होतात. त्यांनी संजय राऊत यांच्या संदर्भात बदनामीकारक वक्तव्य केलं आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी मानहानीचा खटला मुंबईच्या शिवडी न्यायालयामध्ये दाखल केला आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये नमूद केलं आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप येणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा 10 जून पूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असं विधान राणे यांनी केलं होतं.

आमदार नितेश राणे यांच्या विरोधात दावा : अशा प्रकारचा खळबळ जनक दावा सार्वजनिकरित्या करणं म्हणजे संजय राऊत यांची बदनामी करणं आहे. मानहानी हाच हेतू यामधून दिसत असल्याचं राऊत यांनी याचिकेमध्ये नमूद केलं आहे. संजय राऊतांनी याचिकेत ही देखील बाब नमूद केली आहे की, यासंदर्भात 21 ऑगस्ट 2023 रोजीच आमदार नितेश राणे यांच्या विरोधात हा दावा दाखल केलेला आहे. वारंवार त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अशी वक्तव्यं केली. परंतु हे विधान सामाजिक बदनामी करणारं असल्यामुळेच हा दावा दाखल करण्यात आला आहे.

नितेश राणे यांना समन्स : सोमवारी सुनावणीच्या दरम्यान न्यायालयानं वादी प्रतिवादी दोन्ही पक्षांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. परंतु संजय राऊत या सुनावणी करता हजर राहिले. मात्र नितेश राणे हे न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळेच त्यांची अनुपस्थिती पाहता 21 नोव्हेंबर 2023 रोजी नितेश राणे यांना व्यक्तिशः कोर्टात हजर राहावे लागणार आहे. या प्रकारचे समन्स न्यायाधीश एस बी काळे यांनी जारी केले आहे.

हेही वाचा -

Nitesh Rane : ...तर उद्धव ठाकरेंना जबाबदार ठरवायचं का? नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल

Sanjay Raut News : उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा प्लॅन आहे का- खासदार संजय राऊत

Sanjay Raut On Dada Bhuse :...म्हणून मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घ्यावा; संजय राऊतांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.