ETV Bharat / state

Shivaji Park Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने; महापालिकेची भूमिका काय?

Shivaji Park Dasara Melava : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन याही वर्षी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष पेटला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांकडून महापालिकेच्या विभागात अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Shivaji Park Dasara Melava
Shivaji Park Dasara Melava
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 12:08 PM IST

मुंबई Shivaji Park Dasara Melava : मागील वर्षी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात मोठा संघर्ष पेटला होता. दोन्ही गटांनी तेव्हा न्यायालयाची दारं ठोठावली होती. या सगळ्यात मागील वर्षी महापालिका वेट अँड वॉचच्या भूमिकेत होती आणि अखेर हा निर्णय न्यायालयाच्या दरबारी गेला. यावर्षीही असंच काहीसं होण्याची शक्यता आहे. यंदा शिवाजी पार्कसाठी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांनी महापालिकेच्या दादर जी नॉर्थ विभागात अर्ज केले असून, दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. त्यामुळे यावर्षी देखील शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार? अशा चर्चा रंगत आहेत.

दोन्ही गटांकडून परवानगीसाठी अर्ज : शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून विभाग प्रमुख मिलिंद वैद्य यांनी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा साजरा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी महापालिकेच्या दादर येथील जी उत्तर विभाग कार्यालयात अर्ज दिले आहेत. दोन्ही गटांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असं उत्तर पालिकेकडून सांगण्यात आलंय. मागील वर्षी शिवाजी पार्कच्या जागेवरुन महापालिकेनं टाळाटाळ केल्यानं ठाकरे गटानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शेवटी अधिकाऱ्यांची तांत्रिक चूक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला हे मैदान मिळालं होतं.

पहिला अर्ज कोणाचा : यावर्षीही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी जी उत्तर विभाग कार्यालयात अर्ज सादर केले असून, पहिला अर्ज कोणाचा आला? त्याबाबत विभाग कार्यालयानं गुप्तता ठेवलीय. सध्या विविध सण आणि शनिवार रविवार सुट्टी लागून आल्यानं विभागीय कार्यालयाला सुट्टी आहे. त्यामुळं पहिला अर्ज कोणाचा आला हे समजू शकलेलं नाही. कोणाचा अर्ज कोणत्या तारखेला आला? हे आम्ही जाहीर करू शकत नाही. योग्य वेळी ते जाहीर करु, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिलीय. निवडणूक आयोगानं आधीच अधिकृत शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिलीय. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असली तरी तूर्तास शिंदे गटाकडं शिवसेना हे नाव आणि चिन्ह असल्यानं मुंबई महानगरपालिका या एकूणच राजकीय वादात काय भूमिका घेतं? हे पाहणं महत्त्वाच आहे.

महिन्याभरापूर्वीच अर्ज : यासंदर्भात माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेत ठाकरे गटाचे विभाग प्रमुख महेश सावंत यांनी, आम्ही दीड महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या विभागीय कार्यालयात अर्ज दिल्याचं सांगितलंय. तसंच दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा असून, दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानातच होईल, असा दावाही त्यांनी केलाय. तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी, आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं एक महिन्यापूर्वीच महापालिकेच्या विभागीय कार्यालयात अर्ज दिल्याचं सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Shiv Sena Dasara Melava : मुख्यमंत्र्यांना दसरा मेळावा महागात पडणार? याचिकाकर्त्याला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश
  2. Dussehra melava Enquiry Petition : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी आले कुठून? उत्तरासाठी सरकारला हवा वेळ
  3. Shinde faction Dussehra Melawa शिंदे गटाला उच्च न्यायालयाचा झटका, दसरा मेळाव्यावरील याचिकेचे जनहित याचिकेत रूपांतर करण्याचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.