ETV Bharat / state

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जम्मू-काश्मीरला रवाना, मराठा रेजिमेंटची स्फूर्ती वाढणार - कुपवाडा

Shivaji Maharaj Statue : शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला भेट देण्यात येणार आहे. हा पुतळा आज मुंबईतील राजभवनातून रवाना करण्यात आला.

Shivaji Maharaj Statue
Shivaji Maharaj Statue
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 9:00 PM IST

मुंबई Shivaji Maharaj Statue : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. आज (२० ऑक्टोबर) मुंबईतील राजभवनातून हा पुतळा रवाना करण्यात आला. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच पूजन आणि रथपूजन करण्यात आलं.

महाराजांच्या नावातच शक्ती आहे : 'आम्ही पुणेकर फाउंडेशन' व 'छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती' यांच्या पुढाकारानं तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला भेट देण्यात येणार आहे. यावेळी बोलताना राज्यपालांनी शिवाजी महाराजांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. 'अनेक राजांनी स्वतःसाठी महाल बांधले. मात्र शिवाजी महाराजांनी महाल न बांधता राज्य रक्षणासाठी गडकिल्ले बांधले. शिवाजी महाराजांच्या नावातच शक्ती आहे. महाराजांचं नाव घेऊन मी प्रतापगडावर साडेपाचशे पायऱ्या चढून गेलो', असं राज्यपाल म्हणाले.

Shivaji Maharaj Statue
शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जम्मू-काश्मीरला रवाना

गडकिल्ल्यांचं फोर्ट सर्किट तयार करावं : पुढे बोलताना ते म्हणाले की, 'नव्यानं बांधण्यात आलेलं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक पाहण्यासाठी देशभरातून लाखो लोक येतात. मात्र देशातील फार कमी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकिल्ले पाहिले आहेत. हे चित्र बदलायला हवं. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी शिवकालीन गडकिल्ल्यांचं फोर्ट सर्किट तयार करावं. तसेच पर्यटकांना सर्व किल्ल्यांची माहिती देणारे पुस्तक तयार करावं, अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांद्वारे तरुणांना प्रेरणा तर मिळेलच, शिवाय किल्ल्यांचा विकास झाल्यास त्यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असं राज्यपालांनी यावेळी नमूद केलं.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिनाचा सोहळा : यावर्षी ४ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिनाचा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. 'शिवाजी महाराजांची दूरदृष्टी काळाच्या फार पुढे होती. जुलमी मुघल राजवटीतून राज्य मुक्त करून समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्याचं स्वप्न महाराजांनी पाहिलं', असे ते म्हणाले.

महाराजांच्या स्मारकासाठी निधी कमी पडणार नाही : या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना, 'आपल्या देशाच्या बॉर्डरवर महाराष्ट्राचे अनेक सुपुत्र सीमेचं रक्षण करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे सीमेवरील जवानांना हजार हत्तींचं बळ लाभेल. कुपवाडा येथील महाराजांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नाही', असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation Suicide: मुंबईत सणवार येत राहतील पण...मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची मुंबईत आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.