मुंबई - शिवडी येथील टीबी रुग्णालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याला प्रशासाने ताब्यात घेऊन त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. मात्र, त्याच्या समवेत उठबस करणाऱ्या इतर 80 कर्माच्याऱ्यांना रुग्णालयाने वाऱ्यावर सोडलेय असे कर्मचाऱ्यांचे म्हणे आहे. या टीबी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे जे हाल होत आहेत त्याची माहिती त्यांनी स्वतःच व्हिडिओद्वारे दिली आहे.
शिवडीतील टीबी रुग्णालयात कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. त्यात काम करत असताना एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्या सोबत रोज काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी केली. परंतु, इतर कर्मचाऱ्यांना रुग्णालयात सुरक्षेसाठी ठेवले आहे. त्याठिकाणी मात्र प्रशासनाने योग्य व्यवस्था ठेवली नाही, असे कर्मचारी सांगत आहेत. राहण्याची व्यवस्था तर केलीय मात्र खाणे पिणे, बेड, पंखा ,सेफटी किट बेसिक गोष्टी देखील उपलब्ध करून न दिल्याने हे 80 जण भीतीच्या वातावरणात जगत आहोत, असे कर्मचारी म्हणत आहे.
जो कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी आढळला आहे तो रुग्णाच्या संपर्कात होता. तो हॉस्पिटलच नाही तर बाहेरही रस्त्यावर काम करण्यासाठी फिरायचा त्या ठिकाणी देखील प्रशासनाने काळजी घेतली नाही. ही परिस्थिती पाहता कोरोना विषाणूचा मोठा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आमच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी विनंती कर्मचारी करत आहेत.
शिवडी टीबी रुग्णालयातील कर्मचारी कोरोनाबाधित; कर्मचारी भीतीच्या वातावरणात
पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्या सोबत रोज काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी केली. परंतु, इतर कर्मचाऱ्यांना रुग्णालयात सुरक्षेसाठी ठेवले आहे. त्याठिकाणी मात्र प्रशासनाने योग्य व्यवस्था ठेवली नाही असे कर्मचारी सांगत आहेत.