ETV Bharat / state

3 वर्षांपूर्वी शुभारंभ, मात्र अद्याप सापडेना शिवडी पूल पुनर्बांधणीला मुहूर्त

या ठिकाणी पुलाचे काम न झाल्यामुळे लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. हा पूल ज्या मार्गावर आहे मार्ग तो हायवे आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

author img

By

Published : Aug 17, 2019, 10:41 AM IST

Updated : Aug 17, 2019, 12:11 PM IST

शिवडी पूल मुंबई

मुंबई - शिवडी पूर्व पश्चिम भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी उभारण्यात आलेला पादचारी पूल धोकादायक असल्यामुळे 3 वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या वतीने तोडण्यात आला. त्यानंतर हा पूल बांधून देऊ, असे पालिका व नगरसेवकांकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन पूल ओलांडावा लागतो.

अद्याप सापडेना शिवडी पूल पुनर्बांधणीला मुहूर्त

शिवडी पादचारी पूल हा पूर्व भागात आहे. हा पूल 3 वर्षांपूर्वी मोडकळीस आला होता. त्यामुळे हा पूल पाडून पुनर्बांधणी करू, असे सांगण्यात आले होते. या पुलाचे भूमिपूजन शिवसेना स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ व आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते 3 वर्षांपूर्वी झालेही होते. मात्र, आजही या ठिकाणी या पूलाच्या कामला मुहूर्त लागला नाही. विशेष म्हणजे या पुलाच्या शेजारी सुरु असलेली इमारत एक वर्षात तयार झाली आहे.

शिवडी पादचारी पूल परेल व शिवडी या विभागाला जोडणारा आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. त्याचबरोबर या मार्गाने केईएम, टाटा रुग्णालय, वाडिया रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या पूलाचे काम लवकरात-लवकर पूर्ण व्हावे, अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Intro:शिवसेना नगरसेवक व आमदारांच्या हस्ते 3 वर्षांपूर्वी पुलाच शुभारंभ ; शेजारील टॉवर एक वर्षात उभा राहिला मात्र पूल अजून नाही .

शिवडी पूर्व पश्चिम विभागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी उभारण्यात आलेला पादचारी पूल धोकादायक झाल्यामुळे तीन वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या वतीने तोडण्यात आला आणि हे तीन वर्षात बांधून देऊ असे पालिका व नगरसेवक यांच्याकडून सांगण्यात आले होते.मात्र अद्याप या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पालिकेने म्हणजेच जबाबदार प्रतिनिधीने तीन वर्ष उलटले तरी देखील केलेले नाही. लोक ब्रीज पूर्ण झाला नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडत आहेत. त्यामुळे या अगोदर अनेक अपघात घडलेले आहेत आणि आता होऊ नये.त्यामुळे संतप्त झालेले लोक पुलाचं काम कधी होईल ? असा प्रश्न विचारत आहेत .तसेच यात काही भ्रष्टाचार झालाय का ? असा प्रश्न विचारत आहे.

Body:शिवडी पादचारी पूल हा पूर्व भागात असून शेवटी स्थानकालगत हा पूल आहे. हा पूल तीन वर्षांपूर्वी मोडकळीस आला होता. त्यामुळे पालिकेने हा ब्रिज पाडून पुनर्बांधणी करू असे सांगण्यात आले. या पुलाचे भूमिपूजन शिवसेना स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ व आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते तीन वर्षांपूर्वी झाले .हा पूल बांधून देउ यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला .परंतु तीन वर्ष लोटून गेली या पुलाला तरी अद्याप हा पूल झालेला नाही. या पुलाच्या शेजारीच असलेली इमारत ही एक वर्षापूर्वी बांधण्यात सुरुवात केली आणि ती पूर्ण झाली. परंतु हा पूल अजून झालेला नाही यावरून प्रशासनाचा ढिम्म पणा समोर आलेला आहे.

हा पूल नसल्यामुळे लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. हा पूल ज्या मार्गावर आहे तो हायवे आहे. आणि यामुळे यावर मोठे अपघात घडतात. आज पर्यंत अनेक अपघात याठिकाणी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत झाले ,यात कोणाला अपंगत्व तर कोणाला जीव आपले मुकावे लागले आहे . या पुलासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे या विरोधी पक्षांनी स्थानिक शिवसेना नगरसेवक व पालिका दक्षिण विभाग सहाय्यक आयुक्त यांना या पुलाविषयी पत्रव्यवहार केलेला आहे. पण आश्वासन दिल्यानुसार आज पर्यंत हा ब्रिज झालेला नाही असे सर्व विरोधी पक्ष सांगतात.

Conclusion:शिवडी पादचारी पूल हा परेल व शिवडी या विभागाला जोडणारा असून त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. त्याचबरोबर या मार्गाने केईएम, टाटा रुग्णालय, वाडिया रुग्णालय टीव्ही रुग्णालय आधी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. त्यांनादेखील या मार्गाचा वापर करावा लागतो. पूल नसल्यामुळे अनेक अडचणी होतात. हा पूल तीन वर्षापासून पूर्ण होतच नसल्यामुळे.नागरिकांना आता संशय येऊ लागलाय .पूल बांधणीत काहीतरी भ्रष्टाचार झाला असावा ? त्यामुळेच हा पूल बनत नसावा असं लोकांना वाटत आहे.
Last Updated : Aug 17, 2019, 12:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.