ETV Bharat / state

युती फक्त महाराष्ट्रपुरतीच; छत्तीसगडमध्ये शिवसेना लढवणार लोकसभेच्या ११ जागा - lok sabha election

२००० साली मध्यप्रदेशमधून छत्तीसगड या राज्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी हे छत्तीसगड वेगळे राज्य व्हावे, यासाठी शिवसेनेनेदेखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हरयाणा पाठोपाठ तिथे आपल्या पक्षाची स्थापना केली आहे.

छत्तीसगडमध्ये शिवसेना लढवणार लोकसभेच्या ११ जागा
author img

By

Published : Mar 14, 2019, 6:54 PM IST

मुंबई - शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपसोबत युती केली असली तरी इतर राज्यांत शिवसेना स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. छत्तीसगडमध्ये शिवसेना सर्व ११ जागा लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली आहे.

नुकतीच शिवसेना भवन येथे छत्तीसगडच्या शिवसेना नेत्यांची शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत छत्तीसगडमध्ये शिवसेना लोकसभेच्या ११ ही जागा लढवणार असल्याचे निश्चित झाले. छत्तीसगड वेगळे राज्य झाले तरी आजही येथील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न, मोठ्या संख्येने असलेली बेरोजगारी व आरोग्य सुविधांचा अभाव आदी प्रश्नांवर शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. राम मंदिर मुद्दा घेऊन शिवसेनेने पुन्हा एकदा इतर राज्यांत आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः छत्तीसगडमध्ये जाऊन रॅलीला संबोधणार असल्याची माहिती आहे.

२००० साली मध्यप्रदेशमधून छत्तीसगड या राज्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी हे छत्तीसगड वेगळे राज्य व्हावे, यासाठी शिवसेनेनेदेखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हरयाणा पाठोपाठ तिथे आपल्या पक्षाची स्थापना केली आहे. छत्तीसगडमध्ये ११ लोकसभा क्षेत्रासाठी ११, १८ आणि २३ एप्रिल रोजी तीन टप्प्यात मतदान होणार आहे.

Intro:छत्तीसगड मध्ये शिवसेना लढवणार 11 लोकसभांच्या जागा....
युती फक्त महाराष्ट्रपुरती
मुंबई - शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपसोबत युती केली असली तरी इतर राज्यांत शिवसेना स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे.
छत्तीसगडमध्ये शिवसेना भाजपसमोर 11 ही जागा लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली आहे. Body:नुकतीच शिवसेना भवन येथे छत्तीसगडच्या शिवसेना नेत्यांची शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत छत्तीसगडमध्ये शिवसेना 11 ही लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचे निश्चित झाले.
छत्तीसगड वेगळं राज्य झालं तरी आजही
येथील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न, मोठया संख्येने असलेली बेरोजगारी व आरोग्य सुविधांचा अभाव आदी प्रश्नांवर शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. राम मंदिर मुद्दा घेऊन शिवसेनेने पुन्हा एकदा इतर राज्यांत आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः छत्तीसगडमध्ये जाऊन रॅलीला संबोधणार असल्याची माहिती आहे.Conclusion:2000साली मध्यप्रदेशमधून छत्तीसगड या राज्याची निर्मिती करण्यात आली, त्यावेळी हे छत्तीसगड वेगळे राज्य व्हावे यासाठी शिवसेनेने देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हरयाणा पाठोपाठ तिथे आपल्या पक्षाची स्थापना केली आहे.
छत्तीसगडमध्ये 11 लोकसभा क्षेत्रासाठी 11, 18 आणि 23 एप्रिल रोजी तीन टप्प्यात मतदान होणार आहे.

2000साली मध्यप्रदेशमधून छत्तीसगड या राज्याची निर्मिती करण्यात आली, त्यावेळी छत्तीसगड वेगळे राज्य व्हावे यासाठी शिवसेनेने देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हरयाणा पाठोपाठ तिथे आपल्या पक्ष मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत.
छत्तीसगडमध्ये 11 लोकसभा क्षेत्रासाठी 11, 18 आणि 23 एप्रिल रोजी तीन टप्प्यात मतदान होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.