ETV Bharat / state

राजावाडी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी - rajawadi hospital

महापालिकेने नुकतेच १५ दवाखाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरदार वर्गासह सर्वसामान्य रुग्णांना यामुळे दिलासा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर राजावाडी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.

mumbai
राजावाडी रुग्णालय
author img

By

Published : Dec 10, 2019, 11:55 PM IST

मुंबई - घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णालयावर ताण पडतो. पालिकेने ही बाब विचारात घेऊन रुग्णांना दिलासा देण्यासाठी राजावाडी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवावा, अशी मागणी शिवसेनेने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.

प्रकाश वाणी

महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दिवसाला शेकडो रुग्ण येतात. पूर्व उपनगरातील हे महत्त्वाचे रुग्णालय आहे. वाढती रुग्णसंख्या आणि डॉक्टर कर्मचाऱ्यांची पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्यामुळे रुग्णालयावर ताण पडत आहे. तर, रुग्ण किंवा नातेवाईकांना यामुळे धावपळ करावी लागते. शिवाय, तातडीने उपचार मिळत नसल्याने काहीवेळा रुग्णांना जीवास मुकावे लागते. प्रशासनाला यामुळे नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. यातून अनेकदा डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर हल्लेही होतात.

हेही वाचा - शेतकरी, शेतमजूरसह महिलांच्या विविध प्रश्‍नांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन

महापालिकेने नुकतेच १५ दवाखाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरदार वर्गासह सर्व सामान्य रुग्णांना यामुळे दिलासा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर राजावाडी रुग्णालयातील 'बाह्यरुग्ण विभाग' रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवण्यात यावा. तसेच रुग्णालयांर्गत येणाऱ्या बॅ. नाथ पै नगर येथील किरोळ विभागातील पंतनगर शाळा क्रमांक ३, तसेच राजावाडी रुग्णालयाच्या आजूबाजूची 'आरोग्य केंद्रे' रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवावीत. अशी मागणी शिवसेनेचे माजी उपविभागप्रमुख आणि राजावाडी रुग्णालय दक्षता समिती सदस्य प्रकाश वाणी यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे. मंगळवारी वाणी यांनी महापौरांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना दिले.

हेही वाचा - धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे 500 रुपये अनुदान

Intro:मुंबई - घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णालयावर यामुळे ताण पडतो. पालिकेने ही बाब विचारात घेऊन रुग्णांना दिलासा देण्यासाठी राजावाडी रुग्णालयातील ओपीडी रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवावी, अशी मागणी शिवसेनेने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.Body:महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचार्थ दिवसाला शेकडो रुग्ण येतात. पूर्व उपनगरातील हे महत्वाचे रुग्णालय आहे. वाढती रुग्णसंख्या आणि डॉक्टर कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या पदांमुळे रुग्णालयावर ताण पडतो आहे. रुग्ण किंवा नातेवाईकांना यामुळे धावपळ करावी लागते. शिवाय, तातडीने उपचार मिळत नसल्याने काहीवेळा रुग्णांला जीवास मुकावे लागते. प्रशासनाला यामुळे नागरीकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. यातून अनेकदा डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात. महापालिकेने नुकतेच १५ दवाखाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरदार वर्गासह सर्व सामान्य रुग्णांना यामुळे दिलासा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर राजावाडी रुग्णालयातील 'ओपीडी' तसेच रुग्णालयांर्गत येणाऱ्या बॅ. नाथ पै नगर येथील किरोळ विभागातील पंतनगर शाळा क्रमांक ३, तसेच राजावाडी रुग्णालयाच्या आजूबाजूची 'आरोग्य केंद्रे' रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवावीत, अशी मागणी शिवसेनेचे माजी उपविभागप्रमुख आणि राजावाडी रुग्णालय दक्षता समिती सदस्य प्रकाश वाणी यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे. मंगळवारी वाणी यांनी महापौरांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना दिले.

बातमीसाठी प्रकाश वाणी यांची बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.