ETV Bharat / state

राऊत साहेब, आधी सांगा मगच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक व्हा! नरेश म्हस्के यांचा इशारा

संजय राऊतांवर नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार ( Balasaheb Hindutva views ) बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी सांगावे. मगच बाळासाहेबांच्या समाधीपुढे नतमस्तक व्हावे, असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के ( Shiv Sena Party Spokesperson Naresh Mhaske ) यांनी राऊत यांना दिला आहे.

author img

By

Published : Nov 16, 2022, 4:32 PM IST

naresh mhaske
नरेश म्हस्के

मुंबई : बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार ( Balasaheb Hindutva views ) बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी सांगावे. मगच बाळासाहेबांच्या समाधीपुढे नतमस्तक व्हावे, असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के ( Shiv Sena Party Spokesperson Naresh Mhaske ) यांनी राऊत यांना दिला आहे.

नरेश म्हस्के

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच ( CM Eknath Shinde ) करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल वाट्टेल ते बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही, असा टोला म्हस्के यांनी लगावला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती. या टीकेला म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस राष्ट्रवादीशी युती : मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली, मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदसोबत संबंध असलेल्या मंत्र्याला जे आपल्या मंत्रिमंडळातून अखेरपर्यंत काढू शकला नाहीत, बाळासाहेबांना अटक करून तुरुंगात डांबणाचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत ज्यांनी मातोश्रीवर जेवणावळी झाडल्या, ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्ववादी विचारांना कायमची मूठमाती दिली त्यांनाच स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर डोकं ठेवण्याचा अधिकार नसल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले. वारसा हा फक्त रक्ताच्या नात्याचा नसतो तर विचारांचा देखील असतो आणि तोच विचार बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जात असल्याचे म्हस्के म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.