मुंबई - अजित पवारांचा निर्णय पक्षविरोधी, शिस्तभंगाचा आहे. त्यांच्यासोबत जे गेले त्यांच्यावर कारवाई होणार, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. वाय. बी. सेंटरमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पाहा व्हिडियो - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पूर्ण पत्रकार परिषद
-
NCP Chief Sharad Pawar: Congress, Shiv Sena and NCP leaders came together to form Government.We had the numbers. We had our official numbers- 44, 56 and 54 MLAs with us who had supported the govt. Several independent were also with us and we had numbers around 170. pic.twitter.com/BGqonvAqIg
— ANI (@ANI) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">NCP Chief Sharad Pawar: Congress, Shiv Sena and NCP leaders came together to form Government.We had the numbers. We had our official numbers- 44, 56 and 54 MLAs with us who had supported the govt. Several independent were also with us and we had numbers around 170. pic.twitter.com/BGqonvAqIg
— ANI (@ANI) November 23, 2019NCP Chief Sharad Pawar: Congress, Shiv Sena and NCP leaders came together to form Government.We had the numbers. We had our official numbers- 44, 56 and 54 MLAs with us who had supported the govt. Several independent were also with us and we had numbers around 170. pic.twitter.com/BGqonvAqIg
— ANI (@ANI) November 23, 2019
जे सदस्य त्यांच्यासोबत गेले, त्यांना या परिस्थितीची पूर्ण माहिती असावी असे वाटते. जे जाणार असतील त्यांना माहीत असायला हवे, की पक्षांतर बंदी कायदा आहे. त्यानुसार सदस्यत्व रद्द होते. त्यांच्या मतदारसंघातले मतदार त्यांना कधीही पाठिंबा देणार नाहीत. यावेळी राजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर यांनीही प्रतिक्रिया दिली. रात्री अजितदादांचा फोन आला. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही निर्णय घेण्याच्या आतच सर्व घडामोडी झाल्या. सर्व गोष्टींमुळे अस्वस्थ आहोत. आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत, असे शिंगणे म्हणाले.
पवार पुढे म्हणाले, अशाप्रसंगातून मी अनेक वेळा गेलो आहे. काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदाच्या निवडीसंबंधी त्यांची पत्रकार परिषद असल्याने त्यांचे नेते हजर नसल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता हा भाजपबरोबर जाणार नाही याचा मला विश्वास आहे. भाजपला बहुमत स्पष्ट करता येणार नाही, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होईल, असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या गटनेत्याचा आम्हाला पाठिंबा, आम्ही स्थिर सरकार देऊ - दानवे
आमची माहिती आहे की १० ते ११ सदस्य त्यांच्यासोबत गेले आहेत. डॉ. राजेंद्र शिंगणे हे राजभवनावर होते तिथून त्यांची सुटका झाल्यानंतर ते थेट माझ्या घरी आले.
काल रात्री १२ वाजता अजित पवारांचा फोन आला. सकाळी ७ वाजता धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बोलावण्यात आले. मुंबईत एका ठिकाणी चर्चा करण्यासाठी जायचे आहे, असे सांगून राजभवनात नेण्यात आले. राजभवनात नेईपर्यंत आम्हाला कुठे आणि कशासाठी नेले जात आहे याची पुसटशी कल्पना नव्हती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि इतर नेते आले, असे राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा) यांनी सांगितले.
हेही वाचा - अजित पवारांनी पाठीत खंजिर खुपसला - अरविंद सांवत
असेच आणखी काही सदस्य ऑन दे वे आहेत. तेही येथे येतील असे आम्हाला सांगण्यात आल्याचे आमदार संदीप क्षिरसागर (बीड) यांनी सांगितले.
५४ लोकांच्या सह्या असलेला कागद अजित पवारांनी पळवला आणि तोच कागद राज्यपालांना सादर केला. त्यामुळे राज्यपालांचीही फसवणूक झाली आहे की काय? असेही पवार म्हणाले.