ETV Bharat / state

Sanjay Raut Statement संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याप्रमाणे असणार उद्याचा मोर्चा - संजय राऊत - मुंबईत महाराष्ट्र प्रेमींचा महामोर्चा

महाविकास आघाडीच्या ( Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai ) वतीने मुंबईत उद्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ( United Maharashtra Protest ) ज्याप्रमाणे मुंबई, दिल्लीमध्ये मोर्चे निघत होते, त्याप्रमाणे उद्याचा मोर्चा असणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Shiv Sena Thackeray faction MP Sanjay Raut ) यांनी दिली. यावेळी छत्रपती शिवरायांच्या अपमानावेळी भाजपच्या एकाही नेत्याने आवाज उठवला नाही. त्यामुळे भाजप उद्या मुंबईत काढत असलेला मोर्चा म्हणजे अपशकून असल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Mp Sanjay Raut
खासदार संजय राऊत
author img

By

Published : Dec 16, 2022, 6:25 PM IST

मुंबई - राज्यामध्ये महापुरुषाचा सातत्याने होणारा अपमान, राज्यातून बाहेर जाणारे उद्योगधंदे बेरोजगारी आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा ( Maharashtra Karnataka Border Dispute ) भागात मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात उद्या महाराष्ट्र प्रेमींचा महामोर्चा असणार आहे. संयुक्त लढ्यात ज्याप्रमाणे मुंबई, दिल्लीमध्ये मोर्चे निघत होते, त्याप्रमाणे उद्याचा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा असेल, असे मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Shiv Sena Mp Sanjay Raut ) यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना काढले आहेत. केवळ महाविकास आघाडीचा ( MVA Maha Morcha In Mumbai ) हा मोर्चा नसून जे कोणी महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्या सर्वांनी या मोर्चात सामील व्हावे असे आवाहनही संजय राऊत यांनी यावेळी केले.

भाजपचा मोर्चा म्हणजे अपशकून मुंबईतील उद्या होणारा मोर्चा हा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे. मात्र आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( Doctor Babasaheb Ambedkar ) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आधार घेत आपल्या विरोधात काढण्यात येणारा मोर्चा भाजपचा ( BJP Protest In Mumbai ) उद्याच्या मोर्चाला अपशकून असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर ( Doctor Babasaheb Ambedkar ) हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. त्यांची पाळमुळे महाराष्ट्राशी घट्ट आहेत. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांचा अपमान सुरू आहे. यासोबतच कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर ( Maharashtra Karnataka Border Dispute ) मराठी बांधवांना त्रास दिला जातो. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते चकार शब्दही काढत नाहीत. मूग गिळून गप्प बसले आहेत. मात्र अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष ( Bharatiya Janata Party ) या मुद्द्याचे राजकारण करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. भारतीय जनता पक्षाला जोड्याने मारण्याचे काम महाराष्ट्राची जनता करेल आणि या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा अंत होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

भाजपकडून उधार माहिती घेण्याची गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( Doctor Babasaheb Ambedkar ) यांच्याबाबत भारतीय जनता पक्षाकडून माहिती उधार घेण्याची आपल्याला गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे आपण वाचक आहोत. त्यांची अनेक पुस्तक आपण वाचली आहेत. आत्मसात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Doctor Babasaheb Ambedkar ) हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे म्हटल्यावर माफी मागा असे कोण म्हणत असेल तर, त्यांच्या डोक्यातल्या किड्यांची तपासणी करावी लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Doctor Babasaheb Ambedkar ) हे महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात आहेत. भाजप नेते केवळ वैफल्यग्रस्त झाल्यामुळे अशी वक्तव्य करत आहेत, असा टोलाही संजय राऊत ( Shiv Sena Mp Sanjay Raut ) यांनी लगावला आहे.

वारकरी संप्रदाय बाबत आम्हाला नितांत आदर वारकरी संप्रदाय बाबत आम्हाला नितांत आदर आहे. ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे( Sushma Andhare ) यांनी वारकरी संप्रदाबाबत वक्तव्य केले आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, की आम्ही वारकरी संप्रदायाचा खूप आदर करतो. सुषमा अंधारेबाबत सध्या जे काही पसरवले जाते, त्यामागे भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या एका गटाचे काम आहे. ते भाजप पुरस्कृत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ( Chhatrapati Shivaji Maharaj ) वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. त्याबाबत भाजपनेते काहीही बोलले नाही. भाजपने राज्यपालांचा ( Governor Bhagat Singh Koshyari Controversial Statement) निषेध केला नाही. महात्मा फुलेबाबत केलेल्या वक्तव्यांवर भाजप मूग गिळून गप्प बसला आहे. केवळ जुनी प्रकरण काढून वातावरण खराब करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.