ETV Bharat / state

Shiv sena Melava on Dasara 2023: शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन, दोन्ही बाजूनं सोडले जाणार एकमेकांवर टीकेचे बाण

आज सायंकाळी शिवाजी पार्क व आझाद मैदान या दोन ठिकाणी शिवसेनेच्या दोन तोफा धडाडणार आहेत. विजयादशमीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री तसंच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेणार आहेत. आपापल्या मेळाव्याचे टीझर दोन्ही बाजूने प्रकाशित करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा परंपरेनुसार शिवाजी पार्कवर होत आहे. तर यंदा एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदान येथे होत आहे.

Shiv sena Melava on Dasara 2023
Shiv sena Melava on Dasara 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 11:48 AM IST

Updated : Oct 24, 2023, 12:04 PM IST

मुंबई - गेल्या वर्षी शिंदे गटाचा मेळावा मुंबईतील बीकेसी येथे झाला होता. यंदा दोन्ही बाजूनं या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाखांच्या वर जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला आहे. आगामी लोकसभा तसेच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता दोनही गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.

राज्यात मराठा आरक्षणावरून पेटलेलं रान, 'इंडिया' आघाडीतील बिघाडी, कंत्राटी कामगार, जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये असलेला बेबनाव, उद्धव ठाकरे यांची समाजवादी पक्षांशी झालेली जवळीक अशा अनेक मुद्द्यांवर दोन्ही ठाकरे गटाकडून आज आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते आपल्या भाषणातून एकमेकांवर कशा पद्धतीने प्रहार करतात, हे ऐकण्यासाठी व अनुभवण्यासाठी आज लाखो कार्यकर्ते, शिवसैनिक मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत.

दोन मैदानं, दोन तोफा- शिवसेनेचा ( ठाकरे गट) पारंपारिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर होणार आहे. उद्धव ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. शिवसेना व दसरा मेळावा हे अतूट नातं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केलं. लाखो शिवसैनिक याच मेळाव्यातून स्फूर्ती घेत शिवसेनेशी जोडले गेले. परंतु दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानं शिवसेनेत दोन गट झाले. इतकंच नाही तर शिवसेनाचा दसरा मेळावासुद्धा दोन भागांमध्ये विभागला गेला. खरी शिवसेना कोणाची? हा मुद्दा अद्याप न्यायप्रविष्ट असताना शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरूनसुद्धा दावे केले गेले.

दोन्ही मेळावे म्हणजे एक मोठे शक्तिप्रदर्शनचं- न्यायालयाच्या आदेशानुसार उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा वाद टाळत शिवाजी पार्कऐवजी दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानची जागा निवडली. आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांची तोफ आझाद मैदानावर धडाडणार आहे. दोघेही एकमेकांवर आरोप करण्यासाठी प्रचंड ताक्तिनिशी तयार आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर होणारे हे दोन्ही मेळावे म्हणजे एक मोठे शक्तिप्रदर्शनच आहे.

भाजपावर हल्लाबोल करण्यासाठी अनेक मुद्दे - उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपावर हल्लाबोल करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे अनेक पक्षांशी हातमिळवणी करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याशीही त्यांनी जवळीक साधली आहे. त्याचबरोबर इतर पक्षांसोबत होणाऱ्या आघाड्या यावरसुद्धा ते भाष्य करतील. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती याचं खापर भाजप, शिंदे गट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फोडत आहे. या टीकेलासुद्धा उद्धव ठाकरे उत्तर देण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे १६ अपात्र आमदारांसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होत असलेली चालढकल हा ज्वलंत मुद्दा असून तो पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न होईल.

मेळाव्यासाठी जय्यत तयारी- कंत्राटी नोकर भरती, मराठा आरक्षणावर सरकारकडून होणारी जाहिरातबाजी, केंद्र सरकारकडून होणारी घोषणाबाजी या सर्व मुद्द्यांचा समाचार उद्धव ठाकरे आपल्या भाषणात घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखाच्यावर शिवसैनिक जमा होतील अशी आशा आहे. याकरिता भव्य स्टेज उभारण्यात आलं आहे. येणाऱ्या शिवसैनिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची सुद्धा सोय करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी आदित्य ठाकरे यांचे भाषणसुद्धा मेळाव्यात होणार आहे. महानगरपालिकेतील भ्रष्टाचार व खोके सरकार यावर आदित्य ठाकरे आपल्या भाषणात प्रहार करतील, अशी शक्यता आहे. ठाकरे गटाकडून या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा मेळावा शिवाजी पार्कवरच होत असल्याकारणानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आनंद द्विगुणित झाला. आता उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये कशा पद्धतीनं राज्यापासून केंद्रापर्यंत सरकारचा समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा, दसरा उत्सव आहे प्रभू श्रीरामांच्या पराक्रमाचा...

    तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, सीमोल्लंघन करुनी करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची...#विजयादशमी आणि #दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.#Dussehra pic.twitter.com/c32RYhtY6R

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ठाकरे घराणेशाही व केंद्र सरकारची स्तुतिसुमने- उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून राज्यातील शिंदे सरकारसहित केंद्र सरकारपर्यंत सर्वांचा समाचार घेणार असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व शरद पवार, काँग्रेस यांच्यावर हल्लाबोल करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मागच्या वर्षी झालेल्या पहिलाच दसरा मेळावा हा त्यांनी मुंबईतील बीकेसी येथे घेतला होता. सध्या राज्यात पेटलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा, या मुद्द्यावर विरोधकांकडून सरकारवर होणारा हल्लाबोल होत आहे. याबाबत मुख्यमंत्री आपल्या भाषणात प्रखर समाचार घेतील. एकनाथ शिंदे हे आजवर नेहमीच केंद्र सरकारवर स्तुतिसुमने उधळत आले आहेत. मागच्या वर्षी दसरा मेळाव्यात त्यांनी आपल्या भाषणात राज्यातील प्रश्न उपस्थित करण्याऐवजी केंद्र सरकारची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली होती.

उद्धव ठाकरेंवर या मुद्द्यांवरून टीका होण्याची शक्यता- पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे कौतुक करण्यामध्ये ते अव्वल राहिले आहेत. यंदाही त्यांच्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रातील नेत्यांचा उल्लेख व त्यांची प्रशंसा होण्याची शक्यता आहे. पण या सर्व दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीतील कामावरूनही मुख्यमंत्री आजवर टीका करताना दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली इंडिया आघाडी व त्यामध्ये असलेला बेबनाव यावरही एकनाथ शिंदे प्रकाश टाकतील. त्याचबरोबर कंत्राटी कामगार, उद्धव ठाकरे यांची घराणेशाही या मुद्द्यावर सुद्धा ते हल्लाबोल करतील. आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नेते रामदास कदम, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार राहुल शेवाळे यांची भाषणेसुद्धा होणार आहेत.

मेळाव्यासाठी चोख बंदोबस्त- शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली असताना दुसरीकडे शिंदे गटानंसुद्धा आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. संपूर्ण राज्यभरातून या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून शिवसैनिक येणार आहेत. ५ हजार २०० पेक्षा अधिक बस महाराष्ट्रभरातून आझाद मैदानात येणार आहेत. तर ८ ते १० हजार चारचाकी वाहनांचासुद्धा यामध्ये समावेश असणार आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी विदर्भातून दोन स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. नागपूर येथूनसुद्धा बहुसंख्य लोक हे रेल्वेनं येणार आहेत. आझाद मैदानात मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी वाशी, मुलुंड, पडघा,दहिसर चेक नाका येथं चहापान व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. आझाद मैदानातसुद्धा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधेसाठी ५० डॉक्टरांच पथक तैनात ठेवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे नियमित रुग्णवाहिका, कार्डीयाक रुग्णवाहिका, फायर ब्रिगेडची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात पोलिसांवरसुद्धा प्रचंड ताण आहे.

हेही वाचा-

  1. Aaditya Thackeray : गद्दारांचा गट असतो, आमचा पक्ष आहे; दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येनं लोक येणार - आदित्य ठाकरे
  2. Nitesh Rane : दसरा झाल्यावर अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडून जाणार; नितेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट
  3. Dasara Melava : राज्यभरातून हजारो कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानावर येतील - मंत्री उदय सामंत

Last Updated : Oct 24, 2023, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.