मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या हातून आता शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी याबाबतचा आदेश दिला. शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे निवडणूक आयोगाच्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले गेले आहे. उद्धव ठाकरे गट या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. एकनाथ शिंदे गटानेसुद्धा त्याआधी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिल्यास सर्वोच्च न्यायालयाने आयोगाच्या निर्णयावर त्यांचे म्हणणे ऐकूण एकतर्फी सुनावणी घेऊन नये. कोणताही आदेश संपूर्ण पडताळणी केल्याशिवाय देऊ नये. एकनाथ शिंदेंची बाजूही ऐकून घ्यावी, अशी सर्वोच्च न्यायालयाला कॅव्हेटद्वारे विनंती करण्यात आली आहे.
1966 मध्ये शिवसेनेची स्थापना : 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांची स्थापना शिवसेनेची केली होती. भारताच्या इतर भागांतून स्थलांतरित झालेल्यांमुळे महाराष्ट्रात मराठी लोकांना डावलले जात होते. मराठी लोकांना प्राधान्य देण्यासाठी आंदोलने करण्यात आली. त्यातून शिवसेनेचा जन्म झाला. १९८९मध्ये बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत शिवसेनेने युती केली. महाराष्ट्रात १९९५ साली शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. १९९९ साली केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना- भाजपची युती तुटली दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. त्यानंतर पुन्हा एकदा एकत्र येत शिवसेना- भाजपने युती सरकार स्थापन केले. शिवसेनेचे १८ खासदार २०१९ साली निवडून आले. विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली, जिंकली देखील. मात्र, मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली.
महाविकास आघाडीची स्थापना : शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री बनवले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद देण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद दिले. सरकारमध्ये होत असलेल्या घुसमटीमुळे २१ जून २०२२ रोजी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० व अपक्ष आमदारांना सोबत घेऊन बंड केले. महाविकास आघाडी सरकार पडले. सध्या राज्यात शिंदे गट व भाजपचे युती सरकार आहे. मूख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.