ETV Bharat / state

कंगना हा विषय आमच्यासाठी संपला - संजय राऊत

author img

By

Published : Sep 10, 2020, 3:54 PM IST

राऊत म्हणाले, ती (कंगना) काय ट्विट करते, ते आम्ही पाहत नाही.. आम्ही सामना वाचतो. 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या दीर्घ बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सोबत पक्षांतर्गत बाबींची चर्चा झाली. सोनियाजी, शरद पवार नाराज आहेत, अशा अफवा पसरवू नका, अशी त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना विनंती केली.

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई - कंगना काय ट्विट करते ते आम्ही पाहत नाही, आम्ही झाले गेले विसरून गेलो आहोत, अशा शब्दात सामनाचे संपादक संजय राऊत यांनी कंगना वादावर आज प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसांपासून कंगना विरोधात शिवसेना असा संघर्ष सुरू आहे. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून अभिनेत्री कंगनाने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले असून सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून वादग्रस्त विधाने केली जात आहेत.

कंगना मुंबईत दाखल झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने तिच्या कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. त्यानंतरही कंगनाने मुख्यमंत्र्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत टीका केली होती. शिवसेनेच्या वतीने याविषयी कुठलेही आंदोलन केले जाणार नाही किंवा कोणताही प्रवक्ता बोलणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. आज संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.

हेही वाचा - मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेची पवारांनी घेतली पोलीस आयुक्तांकडून माहिती

हेही वाचा - कंगनाची बहीण रंगोलीने केली 'मणिकर्णिका' कार्यालयाच्या तोडफोडीची पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.