ETV Bharat / state

Narayan Rane : नारायण राणेंची सभा उधळण्याचे प्रकरण, अनिल परबांसह शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप निश्चित - अनिल परब यांच्यावर आरोप निश्चित

शिवसेनेचे माजी नेते नारायण राणे यांची सभा उधळून लावल्याप्रकरणी न्यायालयाने शिवसेना नेते व आमदार अनिल परब यांच्यासह इतर आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत.

Narayan Rane Anil Parab
नारायण राणे अनिल परब
author img

By

Published : Jun 6, 2023, 3:35 PM IST

मुंबई : नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडली त्यावेळी त्यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या कार्यालयासमोर जाहीर सभेचे आयोजन केले होते. मात्र या सभेला त्यावेळेला शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध केला होता. त्यांनी या संदर्भात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आज याबाबत सत्र न्यायालयाने आरोप निश्चिती केली आहे. त्याच्या महत्त्वाच्या सुनावणीसाठी सर्व आरोपी हजर होते.

काय आहे प्रकरण? : नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी सामना मुखपत्राच्या कार्यालयाच्या परिसरात जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या वेळेला आमदार सदा सरवणकर, आमदार अनिल परब आणि इतर सर्व तत्कालीन शिवसेनेचेच्या नेत्यांनी त्यांची ही सभा उधळून लावली होती. त्यावरून त्यांच्यावर दादर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. यात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यासह 47 आरोपी आहेत.

या आरोपींनी लावली कोर्टात हजेरी : आज न्यायमूर्ती रोकडे यांच्या न्यायालयामध्ये 3 खासदार, 4 आमदार यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते कोर्टात हजर होते. खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार सदा सरवणकर, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी, आमदार रवींद्र वायकर, दगडू सपकाळ, माजी महापौर विशाखा राऊत, किरण पावसकर, यशवंत जाधव, बाळा नांदगावकर, राजू पेडणेकर, जितेंद्र जानवले यासह 32 आरोपी यांनी कोर्टात हजेरी लावली होती.

सर्व आरोपींंवर आरोपी निश्चिती : सर्व आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 465 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपी न्यायालयात हजर झाले असता न्यायाधीशांनी त्यांना गुन्हा कबुली संदर्भात विचारले, मात्र आरोपींनी गुन्हा कबूल केला नाही. परिणामी न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी आरोप निश्चित केले. आता याच आरोपींच्या इतर केसेसची कार्यवाही नियमित सुरु राहणार आहे.

हेही वाचा - Narayan Rane : नारायण राणे म्हणतात, उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा नंबर पहिला; पण...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.