मुंबई - शिवसेनेचा काल (मंगळवार) मुंबईत दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसैनिकांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेले गाणे ऐकवण्यात आले. हे प्रचारगीत आता राज्यभर गुणगुणले जाणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, शिवसेनेने तयार केलेले नविन गीत हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांच्या वाय एस आर काँग्रेस पक्षाने तयार केलेल्या गाण्याची हुबेहुब नक्कल आहे.
हेही वाचा - शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका; मात्र उध्दव ठाकरेंकडून 'आरे'चा उल्लेखही नाही
हेही वाचा - 'शिवसेना राममंदिराच्या मुद्द्यावर अजूनही ठाम'
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 'आवाज कोणाचा शिवसेनेचा, ध्यास कोणाचा शिवसेनेचा' प्रचारगीत तयार केले आहे. मराठीतील हे गाणं अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले आहे.
मात्र, हे प्रचारगीत एप्रिल महिन्यात झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने तयार केलेल्या गीतासारखेच आहे. जगनमोहन यांच्या पक्षाने 'कावाली जगन, मन जगन' असे गीत तयार केले होते. याच गितासारखे हुबेहुब गीत शिवसेनेनेही तयार केले आहे. या प्रचारगीतीचे संगीत, चाल आणि छायाचित्राचे स्वरुप सारखेच आहे. जगनमोहन आणि आदित्य ठाकरे यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे दोघांचे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आहेत.