मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार का? याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे. युतीबद्दल खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केले आहे. विधानसभेसाठी मतदारसंघ ठरवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे -
युतीबाबत उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांनी युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच आता मी नवीन मार्ग काढला आहे. ज्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे, की तुम्हीच कोणते ते मतदारसंघ ठरवा आणि मला यादी द्या. ती यादी मी शिवसैनिकांसमोर ठेवीन असा उपहासात्मक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.