मुंबई- केंद्र सरकारकडून कलम 370 हटविण्याच्या प्रस्तावावर सर्व स्तरातून मोदी सरकारचं कौतुक केलं जात आहे. देशाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. 370 कलम हटविले तर जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य भाग होणार आहे. त्यामुळे काश्मीर हे सुरक्षित, प्रगतशील राज्य म्हणून उभं राहू शकेल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. कलम 370 रद्द होणार असल्याच्या आनंदाने शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या आमदार आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला आहे.
बाळासाहेब ठाकरे असते तर या भाजप सरकारने घेतलेली निर्णयाचा खूप आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून येत आहे. आज खऱ्या अर्थाने जे चांगलं घडायचे होते ते घडत आहेस, असे देखील आमदारांनी जल्लोष साजरा करताना सांगितले.