ETV Bharat / state

विधानसभाही 'महायुती' एकत्रित लढणार; ठाकरे-फडणवीसांची ग्वाही - विधानसभा

ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या विजया निमित्त सिद्धी संकल्प विजय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभेतही महायुती अभेद्य राहील असे स्पष्ट केले.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 3, 2019, 11:33 PM IST

Updated : Jun 3, 2019, 11:55 PM IST

मुंबई- लोकसभेत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता विधानसभाही महायुती एकत्रित लढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर दिली आहे. ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या विजया निमित्त आयोजित केलेल्या सिद्धी संकल्प सभेत या दोन्ही नेत्यांनी आगामी विधानसभेतही महायुती अभेद्य राहील असे स्पष्ट केले.

ईशान्य मुंबई मधून माजी खासदार किरीट सोमैय्या यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोटक यांच्या प्रचाराला येणेही टाळले होते. मात्र, विजय सिद्धी संकल्प मेळाव्याला ठाकरे यांनी हजेरी लावली. तसेच आगामी विधानसभेत पुन्हा नेत्रदीपक यश मिळवू, असेही सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण

देश वाचवण्यासाठी आम्ही समजूतदारपणा दाखवला-

भाजप आणि शिवसेनेत मतभेद होते, राजकारणात ते होत असते, पण देश वाचवण्यासाठी आम्ही समजूतदार पणा दाखवला. त्यामुळे विरोधकांची हवाच गेली. देश जपण्यासाठी युती केली आहे. विकासाचे शिवधनुष्य नरेंद्र मोदी यांनी पेलले आहे, त्यालाच आमचा पाठिंबा आहे, असेही यावेळी ठाकरे यांनी सांगितले. मात्र, ठाकरे यांनी आपल्या भाषणात किरीट सोमैय्या यांचा उल्लेख टाळला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, सर्व कार्यकर्ते विजयाचे शिल्पकार आहेत. ही सभा म्हणजे मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्याची संधी आहे. या विजयाने निवडणुकीच्या पंडीतांनाही खोटे पाडले निवडणुकी पूर्वी आपण नवं भारताचे चौकीदार होतो. आता आपण नवं भारताचे सैनिक आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विधानसभेतही हीच महायुती एकत्रित निवडणुका लढवून यश मिळवेल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या आधी आशिष शेलार यांचे भाषण झाले, त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत आपण शेलार मामा असल्याचे सांगत आपणच परतीचे दोर कापले असल्याचे मिश्किल शब्दात सांगितले. नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी याप्रसंगी सांगितले की, जनतेने नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत संसदेत काम करण्याची संधी दिली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य सिद्धी संकल्प करू.

Intro:सूचना- या बातमीसाठी Live U वरून आधीच फीड पाठवले आहे.

विधानसभेतही महायुतीवर शिक्कामोर्तब, ठाकरे - फडणवीसांची ग्वाही

मुंबई 3

लोकसभेत घवघवीत यश मिळवल्या नंतर आता विधानसभेतही महायुतीचा एकत्रित लढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर दिली आहे. ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या विजया निमित्त आयोजित केलेल्या सिद्धी संकल्प सभेत या दोन्ही नेत्यांनी आगामी विधानसभेतही महायुती अभेद्य राहील असे स्पष्ट केले.
ईशान्य मुंबई मधून माजी खासदार किरीट सोमैय्या यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी शिवसेने केल्यानंतर शिवसेना आणि भाजप मध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोटक यांच्या प्रचाराला येणे ही टाळले होते. मात्र विजय सिद्धी संकल्प मेळाव्याला ठाकरे यांनी हजेरी लावली. तसेच आगामी विधानसभेत पुन्हा नेत्रदीपक यश मिळवू असेही सांगितले. भाजप आणि शिवसेनेत मतभेद होते, राजकारणात ते होत असते, पण देश वाचवण्यासाठी आम्ही समजूतदार पणा दाखवला.त्यामुळे विरोधकांची हवाच गेली. देश जपण्यासाठी युती केली आहे. विकासाचे शिवधनुष्य नरेंद्र भाई यांनी पेलले आहे, त्यालाच आमचा पाठिंबा आहे, असेही यावेळी ठाकरे यांनी सांगितले.मात्र ठाकरे यांनी आपल्या भाषणात किरीट सोमैय्या यांचा उल्लेख टाळला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, सर्व कार्यकर्ते विजयाचे शिल्पकार आहेत. ही सभा म्हणजे मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्याची संधी आहे. या विजयाने निवडणुकीच्या पंडीतांनाही खोटे पाडले. विरोधकांना वाटत होतं त्यांना फार मोठं यश मिळेल, पण त्यांना शहरी आणि ग्रामीण मतदारांनी नाकारले. सर्व ग्रामीण आणि शहरी मतदारांचे आभार मानतो. निवडणुकी पूर्वी आपण नवं भारताचे चौकीदार होतो आता आपण नवं भारताचे सैनिक आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. विधानसभेतही हीच महायुती एकत्रित निवडणुका लढवून यश मिळवेल असेही त्यांनी सांगितले. आशिष शेलार यांच्या म्हणण्यानुसार आता परतीचे दोर कंपन्यात आले असून महायुती अभेद्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मउख्यमंत्र्यांच्या आधी शेलार यांचे भाषण झाले ,त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत आपण शेलार मामा असल्याचे सांगत आपणच परतीचे दोर कापले असल्याचे मिश्किल शब्दात सांगितले.
जनतेने नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत संसदेत काम करण्याची संधी दिली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य सिद्धी संकल्प करू असे नव निर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी सांगितले. Body:....Conclusion:
Last Updated : Jun 3, 2019, 11:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.