ETV Bharat / state

Shinde vs Thackeray Dispute : ठाकरे गटाचे खासदार महिला आरक्षण विधेयक मतदानावेळी गैरहजर; शिवसेनेनं पाठवली नोटीस - खासदारांना नोटीस

Shinde vs Thackeray Dispute : महिला आरक्षण विधेयकाच्या मतदानावेळी ठाकरे गटाचे चार खासदार गैरहजर राहिले. त्यामुळे शिवसेनेनं बजावलेल्या व्हिप डावलल्याचा आरोप करुन खासदार राहुल शेवाळे यांनी याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहलं आहे. या खासदारांना नोटीस बजावल्याची माहितीही शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं बुधवारी देण्यात आली आहे.

Shinde vs Thackeray Dispute
संपादित छायाचित्र
author img

By PTI

Published : Sep 28, 2023, 7:45 AM IST

मुंबई Shinde vs Thackeray Dispute : महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला. मात्र दुसरीकडं शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटात महिला आरक्षण विधेयकावरुन जोरदार वाद सुरु झाला आहे. महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे चार खासदार गैरहजर होते. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी त्यांना व्हिप ( Shiv Sena Dispute ) डावलल्याप्रकरणी नोटीस जारी केली आहे. त्यामुळे या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं बुधवारी देण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटानं जारी केला होता व्हिप : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडण्यापूर्वी शिंदे गटानं ठाकरे गटाच्या चार खासदारांना व्हिप बजावला होता. मात्र या व्हिपला डावलत ठाकरे गटाच्या चार खासदारांनी लोकसभेत गैरहजर राहणं पसंत केलं होतं. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटानं ठाकरे गटाच्या या चार खासदारांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. शिवसेनेचे विधिमंडळाचे पक्षनेते खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना याबाबत पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ठाकरे गटाच्या या चार खासदारांना नोटीस : खासदार राहुल शेवाळे यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांची नावं आहेत. ठाकरे गटाच्या या चारही खासदारांनी नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 च्या बाजुनं मतदान करण्याचे निर्देश असताना पक्षा व्हिप धुडकावल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाच्या बाजुनं 454 खासदारांनी तर विरोधात 2 खासदारांनी मतदान केलं होतं.

दिल्लीत उपस्थित असूनही खासदार संसदेत गैरहजर : महिला आरक्षण विधेयकावर मतदान होणार असल्यानं शिवसेनेनं 14 सप्टेंबरला व्हिप जारी केला होता, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधित संसदेच्या विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेनं व्हिप बजावून आपल्या आपल्या खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. मात्र व्हिप बजावूनही ठाकरे गटाचे चार खासदार संसदेत गैरजहर राहिले. हे खासदार दिल्लीत असूनही महिला आरक्षण विधेयकावर मतदानावेळी गैरजहर राहिले, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

लोकसभेत भावना गवळी आहेत शिवसेनेच्या व्हिप : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना अधिकृत व्हिप म्हणून मान्यता दिली आहे. याबाबत कोणतंही प्रकरण न्यायप्रविष्ट नाही. त्यामुळे व्हिपची मान्यता अधिकृत आहे. भावना गवळी यांचा व्हिप शिवसेनेच्या सगळ्या 19 खासदारांना लागू होते, असंही राहुल शेवाळे यांनी सांगितलं. महिला विधेयकामुळे उबाठा गटाचा खरा चेहरा समोर आला असल्याचंही राहुल शेवाळे यांनी यावेळी सांगितलं.

कोणाचा व्हिप वैध आहे हे ठरवावं लागेल : शिवसेना उबाठा गटाचे नेते अनिल परब यांना याबाबत विचारलं असता, कोणाचा व्हिप वैध आहे, याबाबत ठरवावं लागेल, असं ते म्हणाले. तर उबाठा गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ही आमच्यासाठी क्षुल्लक बाब असल्याचा हल्लाबोल केला. आगामी निवडणुकीत यापैकी कोणताच खासदार जिंकणार नसल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. For Claim On Shiv Sena : शिवसेनेवरील हक्कासाठी शिंदे ठाकरे भिडले, आयोगाकडे पाठवले ट्रकभर पुरावे
  2. Dussehra Melava : दसरा मेळाव्यासाठी शिंदे, ठाकरे गटाची जय्यत तयारी; ठाण्यातील 'या' नाक्यावर होऊ शकतो राडा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.